सातिवलीतील ज्वेलर्सवर दरोडा टाकणारे ३ जेरबंद

By Admin | Updated: August 22, 2015 22:24 IST2015-08-22T22:24:20+5:302015-08-22T22:24:20+5:30

गेल्या महिन्यात सातिवली येथे असलेल्या एका ज्वेलर्सचे दुकान फोडून अज्ञात चोरट्यांनी २६ लाखांचा सोन्या-चांदीचा ऐवज पळवून नेला होता. या ठिकाणी असलेल्या सीसीटीव्ही

Three stringed robbers | सातिवलीतील ज्वेलर्सवर दरोडा टाकणारे ३ जेरबंद

सातिवलीतील ज्वेलर्सवर दरोडा टाकणारे ३ जेरबंद

वसई : गेल्या महिन्यात सातिवली येथे असलेल्या एका ज्वेलर्सचे दुकान फोडून अज्ञात चोरट्यांनी २६ लाखांचा सोन्या-चांदीचा ऐवज पळवून नेला होता. या ठिकाणी असलेल्या सीसीटीव्ही फुटेजच्या साहाय्याने पोलिसांनी ३ जणांना अटक केली आहे. या रॉबरी प्रकरणातील अन्य एक जण फरार असून त्याचा शोध घेण्यात येत आहे.
३० जुलै रोजी सातिवली मौर्यानाका येथे असलेल्या जयताराम नेमाराम चौधरी यांचे मोतीे ज्वेलर्स हे दुकान फोडून ऐवज पळवण्यात आला होता. याप्रकरणी वालीव पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज मिळवून तपास सुरू केला असता हा गुन्हा शिकलकर टोळीतील काही जणांनी केल्याचे स्पष्ट झाले. त्यानुसार, मोसी सिंग ऊर्फ बबलू सिंग रा. भिवंडी, विकी सिंग कल्याणी रा. हडपसर पुणे व त्याचा साथीदार कुंदन सिंग यांना झाली. यातील कुंदन सिंगचा मित्र फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

ऐवज लुटल्यानंतर आरोपींनी ते सर्व दागिने कल्याण येथील सोनार मोनू संजय शेठ यास विकल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर, पोलिसांनी मोनू यास अटक करून १४ लाख ७ हजारांचा ऐवज हस्तगत केला. गुन्ह्यातील आरोपी भूसी सिंग व विकी सिंग यांच्यावर प्रत्येकी ३२ व १६ गुन्हे दाखल आहेत.

Web Title: Three stringed robbers