शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

तीन सरपंच, उपसभापतींसह कार्यकर्ते भाजपमध्ये? पालघरमध्ये आज पक्ष प्रवेश कार्यक्रम

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2024 14:27 IST

लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांचे संकेत मिळू लागल्याने भाजप, दोन्ही शिवसेना, बहुजन विकास आघाडी, काँग्रेस आदी पक्षांकडून आक्रमक रणनीती आखली जात आहे.

पालघर : जिल्ह्यात भाजप भलतीच आक्रमक झाली असून, नुकत्याच झालेल्या ५१  ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत थेट विजयी झालेल्या तीन सरपंच आणि एका उपसभापतीसह अनेक कार्यकर्ते भाजपच्या गळाला लागले आहेत. त्यांचा पक्ष प्रवेश सार्वजनिक बांधकाममंत्री तथा पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत बुधवारी मनोरच्या सायलेंट रिसॉर्ट येथील मेळाव्यात होणार आहे.

लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांचे संकेत मिळू लागल्याने भाजप, दोन्ही शिवसेना, बहुजन विकास आघाडी, काँग्रेस आदी पक्षांकडून आक्रमक रणनीती आखली जात आहे. चिंचणी येथे शिवसेना शिंदे गटाचे राज्य समन्वयक आणि प्रवक्ते नरेश मस्के जिल्हा संपर्कप्रमुख आमदार रवींद्र फाटक, जिल्हा निरीक्षक पांडुरंग पाटील, खासदार राजेंद्र गावित, आमदार श्रीनिवास वनगा, जिल्हाप्रमुख कुंदन संखे यांच्या उपस्थितीत बुथ स्तर बांधणी मजबूत करण्यासाठी संघटनात्मक कार्य म्हणून शिवदूत मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी पक्ष प्रवेश होणार आहे.

- पालघर लोकसभा मतदार संघ सध्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना गटाकडे असून, विद्यमान खासदार राजेंद्र गावित हेच पुढच्या पालघर लोकसभा मतदार संघाचे उमेदवार असतील, असे नरेश मस्के यांनी जाहीर केले होते. या घोषणेआधीच भाजपचे पालघर जिल्हाध्यक्ष भरत राजपूत यांनी पालघर लोकसभा आणि तीन विधानसभा कोणत्याही परिस्थितीत भाजप पक्ष लढवणार असल्याचे जाहीर केले होते. 

युतीला ठेच लागण्याची शक्यताअलीकडेच झालेल्या ग्रामपंचायत सरपंचपदाच्या निवडणुकीत थेट मतदारातून निवडून आलेल्या ५१ नवनिर्वाचित सरपंचांपैकी पालघर तालुक्यातील तीन मोठ्या ग्रामपंचायतींचे सरपंच आणि एक पंचायत समितीचा उपसभापती भाजप पक्षाच्या गळाला लागल्याची खात्रीलायक बातमी नाव न सांगण्याच्या अटीवर ‘लोकमत’ला दिली. या पक्ष प्रवेशात जिल्हाध्यक्ष भरत राजपूत यांची मोठी भूमिका असल्याचे सांगितले जात आहे. 

टॅग्स :BJPभाजपाsarpanchसरपंचPoliticsराजकारण