महामार्गावर तीन दरोडेखोरांना अटक
By Admin | Updated: February 22, 2017 04:47 IST2017-02-22T04:47:49+5:302017-02-22T04:47:49+5:30
मुंबई-अहमदाबाद महामार्गावर चारोटी नाका येथे दरोड्याच्या तयारीत असलेल्या तीन दरोडेखोरांना जेरबंद करण्यात आले.

महामार्गावर तीन दरोडेखोरांना अटक
डहाणू : मुंबई-अहमदाबाद महामार्गावर चारोटी नाका येथे दरोड्याच्या तयारीत असलेल्या तीन दरोडेखोरांना जेरबंद करण्यात आले.
संदीप धांगडा मेंढवण,संदीप दळवी, काकड्या वरठा रायतळी अशी आरोपींची नावे असून, ते रात्री १.३० च्या सुमारास महामार्गावर दरोडा टाकण्याच्या तयारीत असताना ही कारवाई करण्यात आली आहे. अंधाराचा फायदा घेऊन दोन आरोपी फरार झाले आहेत. याबाबत कासा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस निरीक्षक जयप्रकाश घुटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक देशमुख आधिक तपास करीत आहेत. (प्रतिनिधी)