डहाणू बंदरातील तीन बोटी परतल्या, वादळामुळे मासेमारीला फटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2017 00:34 IST2017-12-05T00:33:40+5:302017-12-05T00:34:41+5:30
अनिरूद्ध पाटील ओक्खी वादळामुळे डहाणू समुद्रात खराब हवामानाचा ईशारा देणारा तीन नांबेरचा बावटा लावण्यात आला आहे.

डहाणू बंदरातील तीन बोटी परतल्या, वादळामुळे मासेमारीला फटका
अनिरूद्ध पाटील ओक्खी वादळामुळे डहाणू समुद्रात खराब हवामानाचा ईशारा देणारा तीन नांबेरचा बावटा लावण्यात आला आहे. त्यामुळे मच्छिमारांनी मासेमारीला न जाण्याचे निर्देश झुगारून मातोश्रीप्रसादसह भाग्यसाई नावाच्या दोन बोटी समुद्रात गेल्या. दरम्यान संपर्क साधुन विषयाचे गांभिर्य सांगितल्या नंतर सायंकाळी साडेसहा वाजेच्या दरम्यान तिन्ही बोटी सुखरूप बंदरात दाखल झाल्याचे मत्स्य व्यवसाय विभागाच्या डहाणू कार्यालयाचे परवाना अधिकारी अनिल बावीस्कर यांचे म्हणणे आहे.
डहाणू किनाºयावर रविवारच्या रात्री उच्चतम भरती रेषेपर्यंतची पातळी लाटांनी गाठल्याने खाजण क्षेत्रात भरतीच्या पाण्याने शिरकाव केला. कालपर्यंत दोन नंबरचा बावटा होता. ओक्खी वादळाची तीव्रता वाढत असून ढगाळ वातावरणासह वादळ सदृश्यिस्थती कायम असून डहाणूच्या समुद्राला खराब हवामानाचा ईशारा देणारा तीन नंबरचा बावटा मेरीटाईम विभागाने लावला आहे. मच्छमारांनी खोल समुद्रात न जाता बंदरात होड्या नांगरण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्याची अंमलबजावणी व्हावी यासाठी मत्स्य व्यवसाय विभागाच्या डहाणू कार्यालयातर्फे वार्डन जातीने लक्ष देऊन मार्गदर्शन करीत आहेत. मात्र डहाणू बंदरातील भाग्यसाई (आयएनडी-एमएच-२-एमएम-३५७२), मातोश्रीप्रसाद (आयएनडी-एमएच-२-एमएम-२६९०) आणि भाग्यसाई (आयएनडी-एमएच-२-एमएम-२८४१) या तीन मासेमारी बोटी सूचनांचे पालन न करता समुद्रात गेल्या असून त्यांच्याशी उशिरापर्यंत संपर्क झाल्याचे अधिकारी म्हणाले.तालुक्यात डहाणू आणि धाकटी डहाणू ही दोन मोठी बंदरे असून अनुक्र मे ११५ व १५४ मासेमारी नौका आहेत. तर वरोर २९, आगर-नरपड १७, चिंचणी ६, चिखले ४, घोलवड आणि बोर्डी प्रत्येकी एक बोटी आहेत. शिवाय तर तलासरी तालुक्यातील झाई बंदरात १८० नौका आहेत. सर्व जहाजे सुखरूप असून किनाºयावर नांगरण्यात आल्या आहेत. ओखी वादळामुळे ऐन मासेमारी हंगामात दोन दिवस मासेमारी बंद असून त्याचा फटका मकच्छीमारांना बसतो आहे.