दरोडा टाकण्यासाठी आलेल्या तिघांना वसईत अटक
By Admin | Updated: October 23, 2015 00:12 IST2015-10-23T00:12:51+5:302015-10-23T00:12:51+5:30
वसई-विरार पूर्वेस कामण भागात एका घरावर दरोडा टाकण्यासाठी आलेल्या ७ जणांच्या टोळीमधील तिघांना गावकऱ्यांनी पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले. उर्वरित चौघे मात्र अंधाराचा
_ns.jpg)
दरोडा टाकण्यासाठी आलेल्या तिघांना वसईत अटक
वसई : वसई-विरार पूर्वेस कामण भागात एका घरावर दरोडा टाकण्यासाठी आलेल्या ७ जणांच्या टोळीमधील तिघांना गावकऱ्यांनी पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले. उर्वरित चौघे मात्र अंधाराचा फायदा घेऊन पळून गेले.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार गुरुवारी पहाटे महेंद्र शिवशंकर ठाकूर यांच्या शिलोत्तर गावातील घराच्या स्वयंपाकघरातील खिडकीचे ग्रील तोडून ७ जण शिरले. ऐवज लुटण्याच्या प्रयत्नात असतानाच ठाकूर कुटुंबीय जागे झाले व त्यांनी आरडाओरड करण्यास सुरुवात केली. घराबाहेर गर्दी जमल्याने हे दरोडेखोर पळून जाण्याच्या तयारीत होते. मात्र, गावकऱ्यांनी त्या ७ जणांपैकी बलदेव विश्नोई, हनुमान विश्नोई आणि मेहेरवान लालराम या तिघांना चांगलाच चोप देऊन पोलिसांच्या ताब्यात दिले.
हे तिघे एका गॅस कंपनीत गॅस दुरुस्तीचे काम करतात. घटनास्थळावरून पोलिसांनी एक मोटरसायकल आणि कार जप्त केली आहे. या वेळी अन्य चार आरोपी अंधाराचा फायदा घेऊन पळून गेलेत. (प्रतिनिधी)