शहरं
Join us  
Trending Stories
1
आमचा पक्ष काँग्रेसच, पण सांगलीत चिन्ह चोरीला गेले; विशाल पाटील यांची ‘लोकमत’ला मुलाखत
2
राहुल गांधींच्या वक्तव्यामुळे २०० विद्यापीठांचे कुलगुरू संतप्त, कारवाईची मागणी
3
उपमुख्यमंत्र्यांनी काँग्रेसच्या नगरसेवकाला मारली थप्पड, भाजपाने शेअर केला व्हिडीओ 
4
स्टेशन मास्तरला लागली डुलकी, मिळाला नाही सिग्नल, स्टेशनवर खोळंबली ट्रेन, ड्रायव्हर हॉर्न वाजवून दमला, अखेर...
5
१५ हजार सॅलरी, १० हजारांची लाच अन् घरी सापडले ३० कोटी; वाचा इनसाईड स्टोरी
6
स्वामी समर्थ पुण्यतिथी: स्वामीपूजनानंतर आवर्जून म्हणा, श्री स्वामी समर्थ महाराजांची आरती
7
सडलेला तांदूळ, खराब नारळ, लाकडाचा भूसा, केमिकलने बनवायचे मसाले, 'असा' झाला पर्दाफाश
8
स्वामी समर्थ पुण्यतिथी: शेकडो वर्षे लोटली, स्वामी आजही समस्त भक्तांच्या पाठीशी आहेत!
9
मी राजकारणातील सासू, तर अर्जुनराव हे माझी सून; रावसाहेब दानवे यांची टोलेबाजी
10
अक्षय्य तृतीयेला २ राजयोग: ६ राशींना लाभच लाभ, येणी मिळतील; नोकरीत संधी, लक्ष्मी शुभ करेल!
11
SBI मधून २० वर्षांसाठी ₹३० लाखांचं घ्याल Home Loan? किती असेल EMI, किती द्याल व्याज, पाहा
12
खुद्द अजित पवार उभे असते, तर... ; सुनेत्रा पवारांवरून सुप्रिया सुळेंचे महत्वाचे वक्तव्य
13
Godrej Family Tree: गोदरेज समूहाची 'अशी' झालेली सुरुवात, पाहा आज कुटुंबात कोण-कोण सांभाळतंय व्यवसाय?
14
'त्यात चुकीचं काय?' साडी नेसण्यावरुन ट्रोल झाल्यानंतर ओंकार भोजनेने दिलं उत्तर
15
लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील २ पक्षांचं अस्तित्व संपेल; पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
16
२६/११ हल्ला: कसाब आणि हेमंत करकरे आमने-सामने आले तेव्हा नेमकं काय घडलं? आरोपपत्रात नोंद आहे सर्व घटनाक्रम  
17
राजकारण राजकारणाच्या जागी, नाते नात्याच्या जागी; सुनेत्रा पवारांची बारामतीवर उत्तरे...
18
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजाची तेजीसह सुरुवात; कोटक बँकेत तेजी, टायटन आपटला
19
नोकराच्या घरी सापडलं कोट्यवधीचं घबाड; ऐन निवडणुकीत ED च्या कारवाईनं मोठी खळबळ
20
अमेठीत गोंधळ, काँग्रेस कार्यालयाबाहेर अनेक वाहनांची तोडफोड, भाजपावर आरोप

रोजगार हमीचे तीन तेरा : पगार न मिळाल्याने बुरे दिन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2018 2:24 AM

तीन महिने झाली चणचण

मोखाडा : ‘मागेल त्याला काम आणि १५ दिवसात दाम’ या तत्वावर कार्यरत असलेली महात्मा गांधी रोजगार हमी योजनेत तीन महिन्याचा कालावधी उलटत आला असतानाही केलेल्या कामाचा मोबदला मिळाला नसल्याने आदिवासी आंदोलनाचा सुर आळवित आहेत.तालुक्यातील धामणशेत कोशिमशेत ग्रुप ग्रामपंचायती मधील धमानशेत येथिल १५० मजुरांनी फेब्रुवारी महिन्यात १२ दिवस कृषी विभाग यंत्रनेच्या मजगी (बांध) चे काम केले आहे परंतु बऱ्याच दिवसाचा कालावधी उलटूनही केलेल्या कामाचा मोबदला मिळालेला नाही. पैशाची चणचण व गरिबी येथे पाचवीला पुजलेली असल्याने रोजगार हमीच्या पैशांसाठी त्यांना तालुक्याला जाण्यासाठीही उसनवारी करावी लागत आहे. आणि ते करुनही सरकारी बाबू रित्या हातानी परत पाठवीत असल्याने आदिवासींच्या पदरी निराशा पडत आहे. याबाबत नायब तहसिलदार पी. जी. कोरडे यांच्याशी संपर्क साधला असता तो होऊ शकलेला नाही.

आम्ही फेब्रुवारी महिन्या मध्ये कृषी विभागाच्या मजगीचे (बांध-बंधारा) काम केले आहे. परंतु तिसरा महीना संपत आला तरी आम्हाला मोबदला मिळालेला नसल्याने आमच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे- भिका शिंदे-मजूर ( गाव धामणशेत)

टॅग्स :Farmerशेतकरी