एकोणचाळीस ग्रा.पं. च्या निवडणुका जाहीर, २६ डिसेंबरला मतदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2017 03:09 AM2017-11-22T03:09:41+5:302017-11-22T03:10:21+5:30

पालघर : जानेवारी व फेब्रुवारीत मुदत संपणाºया व नव्याने स्थापित झालेल्या जिल्ह्यातील ३९ ग्रामपंचायतीच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाला

Thirty nine gram pumps Elections to be announced, on 26th December | एकोणचाळीस ग्रा.पं. च्या निवडणुका जाहीर, २६ डिसेंबरला मतदान

एकोणचाळीस ग्रा.पं. च्या निवडणुका जाहीर, २६ डिसेंबरला मतदान

Next

पालघर : जानेवारी व फेब्रुवारीत मुदत संपणा-या व नव्याने स्थापित झालेल्या जिल्ह्यातील ३९ ग्रामपंचायतीच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाला असून या ग्रामपंचायतीच्या थेट सरपंचपदासह सदस्यांसाठी २६ डिसेंबर रोजी मतदान होणार आहे तर २७ डिसेंबर रोजी मतमोजणी होईल.
या कार्यक्रमानुसार अर्ज भरण्याची मुदत ५ ते ११ डिसेंबरपर्यंत असेल. त्यांची छाननी १२ डिसेंबर रोजी होईल तर माघार घेण्याची मुदत १४ डिसेंबरपर्यंत आहे. २६ डिसेंबर रोजी सकाळी ७.३० ते संध्याकाळी ५.३० पर्यंत मतदान होईल. या निवडणुकांमध्ये डहाणू तालुक्यातील १४, पालघर तालुक्यातील १२, विक्र मगड १, वसई ३, मोखाडा २ व तलासरी तालुक्यातील ७ ग्रामपंचायतींचा समावेश आहे.
तालुक्यानिहाय निवडणूक असलेल्या ग्रामपंचायती
डहाणू तालुका : वंकास , राई , सोगावे, आंबेसरी, बोर्डी, किन्हवली, मोडगाव, जाम्बुगाव, कापशी, सावटा, गांगणगाव, दापचरी, गोवणे, दाभोण
पालघर तालुका : उच्छेळी , सालवड, उनभाट, टेम्भीखोडावे, चटाळे, लालोंडे, खानिवडे-गारगाव, शिरगाव, लालठाणे, जलसार, कपासे , मासवण
वसई तालुका : अर्नाळा, सायवन, अर्नाळा किल्ला
विक्र मगड तालुका : मलवाडा
मोखाडा तालुका : साये ,
किनिस्ते
तलासरी तालुका : धिमाणिया , गिरगांव, करंजगाव,
कवाडा , कुर्जे,
उपलाट, उधवा

Web Title: Thirty nine gram pumps Elections to be announced, on 26th December

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.