शहरं
Join us  
Trending Stories
1
'देशाच्या राजकारणातील आशादायी नेतृत्व...'; संजय राऊत यांची नितीन गडकरींसाठी खास पोस्ट
2
कॉलेजमध्ये मराठीत बोलल्याने विद्यार्थ्याला हॉकी स्टिकने मारहाण, जिवे मारण्याची धमकी देऊन आरोपी फरार
3
"महायुती सरकारने महाराष्ट्राचा बनवला तमाशा, विधानसभेत क्लब तर बाहेर WWF चा आखाडा’’, काँग्रेसची बोचरी टीका  
4
वाखारीत न्यू अंबिका कला केंद्रात गोळीबार;आमदाराच्या भावासह चौघांवर गुन्हा दाखल
5
IND vs ENG: चेंडू खेळला नाही म्हणून पंचांनी गिलला दिलं OUT; स्टोक्सच्या गोलंदाजीवर काय घडलं? (VIDEO)
6
बहीण मित्रासोबत गेली लॉजवर, पाठलाग करत पोहचला भाऊ, रंगेहात पकडलं आणि...
7
IND vs ENG : यशस्वीची फिफ्टी ठरली खास; कारण ओल्ड ट्रॅफर्डच्या मैदानात ५० वर्षांनी असं घडलं
8
Nala Sopara: नालासोपाऱ्यात १२व्या मजल्यावरून पडून तीन वर्षांच्या चिमुकलीचा मृत्यू!
9
मुंबईकरांसाठी खुशखबर! शहराला पाणीपुरवठा करणारा तानसा तलाव ओसंडून वाहू लागला!
10
३२ लाखांची FD, संपत्तीची हाव... दत्तक मुलाचं आईसोबत भयंकर कृत्य, आता मिळाली शिक्षा
11
VIDEO: कॉलर पकडली, डोक्यावर फाईट मारली.. भिवंडीत टेम्पोचालक व पोलिसांमध्ये तुंबळ हाणामारी
12
चार किलो सोनं चोरलं, जुगारात २५ लाख जिंकले, पण सेकंड हॅड मोबाईलच्या नादात अडकला चोर  
13
...अन् यशस्वी जैस्वालची बॅट दांड्यातून निखळली; किती वेगाने आला होता चेंडू? जाणून घ्या बॅटची किंमत
14
गुजरात ATS ची मोठी कारवाई; अल-कायदाशी संबंधित चार दहशतवाद्यांना अटक
15
मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपातर्फे आयोजित रक्तदान कार्यक्रमाने रचले २ विश्वविक्रम
16
"तुम्ही लहान होतात, तुमच्या आई-वडीलांच्या सरकारमध्ये..."; नितीश यांनी तेजस्वी यादवांना सुनावलं
17
भारत-नेपाळ सीमेवर एसएसबी जवानांशी झटापट; गोळीबारात जवानाच्या डोक्यात लागली गोळी, हल्लेखोरही जखमी
18
'आम्हाला चुकीचे मृतदेह', अहमदाबाद विमान अपघाताबाबत ब्रिटिश कुटुंबांचा धक्कादायक दावा
19
बॉयफ्रेंडला धोका, उद्योगपतीशी लग्न... आता पतीपासून वेगळी राहते 'ही' बिग बॉस विनर?
20
Maharashtra Rain Alert: मुंबई, पुण्यासह 'या' जिल्ह्यांना अतिवृष्टीचा इशारा, हवामान विभागाकडून रेड अलर्ट

‘त्या’ इमारतींतील रहिवाशांना बळजबरीने बाहेर काढणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2019 23:13 IST

वसई, नालासोपारा, विरार मधील वास्तव : संक्रमण वसाहतींचा अभाव

विरार : वसई विरार महानगरपालिकेच्या हद्दीत येणाऱ्या धोकादायक इमारतींची यादी जाहीर झाली असून महानगरपालिकेने जबरदस्ती घरं खाली करण्याचा निर्णय घेतला आहे. महानगरपालिकेच्या या निर्णयामुळे रहिवाशांवर बेघर होण्याची वेळ आली आहे. अनेक रहिवाशांना पर्यायी सोय नसल्यामुळे अजूनही ते त्याच इमारतींमध्ये राहत आहेत.

दरवर्षी वसई विरार महानगरपालिकेच्या हद्दीत येणाºया धोकादायक इमारतींची यादी जाहीर केली जाते. तीनुसार यावर्षी धोकादायक इमारतींची संख्या वाढल्याचे दिसून येते. वसई विरार महानगरपालिकेच्या हद्दीत ७३५ धोकादायक इमारती आहेत यातल्या २७२ अतिधोकादायक आहेत धोकादायक व अन्य वर्गात मोडणाºया ४६३ इमारती आहेत. महापालिकेने रहिवाशांना घरे रिकामी करण्याची नोटीस पाठवली आहे. परंतु बेघर झालेल्या नागरिकांना राहण्याकरीता ट्रान्झीट कॅम्पची सुविधा देखील नाही. धोकादायक इमारती दुरुस्त होईपर्यंत अथवा पुन्हा तयार होईपर्यंत राहण्यासाठी पर्याय नसलेल्या रहिवाशांना रहाण्यासाठी लागणारे ट्रान्झीट कॅम्प बांधण्याचे आश्वासन देत आहे, परंतु त्यासाठी ठोस पावले उचलत नाही. रहिवाशांची आर्थिक परिस्थिती सक्षम नसल्याने त्यांना स्वखर्चाने घर घेणं परवडणार नाही. त्यातही आता शाळा सुरु होणार आहेत अशा वेळी त्यांना घर बदलणे शक्य होणार नाही. पालिकेकडे फक्त रात्र निवारा केंद्र आहेत पण ट्रान्झीट कॅम्पचे काय? रात्र निवारा केंद्रात इतकी मोठी संख्या राहू शकणार नाही. गेल्या अनेक वर्षांपासून महापालिका ट्रान्झीट कॅम्प बांधण्याचे अश्वासन देत आहे परंतु त्याबाबतीत ठोस पावले उचलत नसल्याने यावर्षी देखील अनेक कुटुंबे बेघर होणार आहेत.घरांचे भाडं वाढल्याने स्व खर्चाने घर घेण्या इतकी आर्थिक परिस्थिती नसल्याने रहिवासी जीव मुठीत धरून त्याच इमारतींमध्ये राहत आहेत. रिहवाश्यांच्या जीवाला धोका असताना देखील महानगरपालिकेने मदत करण्यास नकार दिला आहे. तसेच रहिवाशांना इमारतींमधून काढण्यासाठी महानगरपालिके तर्फे पाणी कपात व वीज कपात देखील करण्यात येणार आहे. रिहवाश्यांनी इमारत सोडली तर बेघर होतील आण िनाहीच सोडली तर जीव जेईल अशी परिस्थिती असताना देखील पालिके तर्फे सक्ती दाखवण्यात येत आहे.

ट्रॅन्झीट कॅम्पची गरज : दरवर्षी हजारो लोकं बेघर होतात त्यांना पालिके तर्फे निवारा म्हणून ट्रान्झीट कॅम्पची गरज असते रात्र निवारा केंद्रात ६० ते 70 लोकं राहू शकतात पण कुटुंब असले तर त्यांना मोठी जागा लागते. यासाठी महानगरपालिकेने ट्रान्झीट कॅम्प उपलब्ध करणे गरजेचे आहे.

रहिवाशांना आपले घर स्वत: साकारावे लागेल. महापालिके तर्फे कसलीच मदत होणार नाही. आणि महापालिका आता सक्तीने इमारती खाली करण्याचा प्रयत्न करणार आहे. - दिलीप पालव, अग्निशमन विभाग अधिकारी

वसई- विरारमधील धोकादायक इमारती आणि संख्या

  • नवघर माणकिपूर 154
  • नालासोपारा पूर्व 156
  • नालासोपारा पश्चिम 92
  • वालीव 84
  • चंदनसार 77
  • आचोळे 60
  • वसई 52
  • बोळींज 25
  • पेल्हार 4
  • एकूण ७३५