एसटीमुळे ‘ते’ रोजगारास मुकले
By Admin | Updated: May 6, 2017 05:18 IST2017-05-06T05:18:54+5:302017-05-06T05:18:54+5:30
हातावर पोट असणाऱ्या येथील तब्बल ५३ आदिवासी तरुणांना एसटीच्या गलथान कारभारामुळे शुक्रवारी रोजगारास मुकावे

एसटीमुळे ‘ते’ रोजगारास मुकले
सुरेश काटे /लोकमत न्यूज नेटवर्क
तलासरी : हातावर पोट असणाऱ्या येथील तब्बल ५३ आदिवासी तरुणांना एसटीच्या गलथान कारभारामुळे शुक्रवारी रोजगारास मुकावे लागले. रोज सकाळी येणारी बस वाहका आभावी आलिच नाही. सकाळी साडे सहा वाजता थांब्यावर आलेल्या या मजूरांना नेहमीची वेळ उलटून दोन तास झाले तरी बस येणार नाही याची सूचना सुद्धा मिळू शकली नाही.
तलासरी बस स्थानकातून संजाण, उंबरगाव येथे कामासाठी जाणारे शेकडो कामगार रोज प्रवास करतात. ते गुजरातमधील वापी, उंबरगाव, संजाणमध्ये जातात. त्यांना जाण्या येण्यासाठी बसेस कमी आहेत. त्यामुळे ना इलाजास्तव त्यांना खाजगी वाहनाने प्रवास करावा लागतो. तुटपुंजे वेतन त्यात खाजगी वडाप वाहतूकीची मनमर्जी लुट, दाटीवाटीने बसने या प्रकारामुळे कामगारांची कुजंबना होत असते. आगारातून आदिवासी भागासाठी बसेस सोडल्या जातात, या फेऱ्या मनमानी पद्धतीने सुरु असल्याने प्रवाशांना याचा मोठा त्रास होतो.
आगारामध्ये बस वाहकांनी संख्या कमी आहे. त्यातच लग्नाचा मोसम असल्याने रजा न घेता वाहक दांड्या मारत असल्याने अनेक फेऱ्या रद्द कराव्या लागतात. अशी आगतिकता डहाणू आगाराच्या व्यवस्थापक मंजिरी बेहेरे यांनी व्यक्त के ली.