तीन धरणांच्या कालव्यातून पाणीच नाही
By Admin | Updated: December 31, 2016 02:42 IST2016-12-31T02:42:13+5:302016-12-31T02:42:13+5:30
तालुक्यातील जलसंपदा-जलसंधारण विभागांतर्गत बांधण्यात आलेल्या झांजरोली, करवाळे आणि वांद्री धरणाच्या कालव्यांमधून शेतीसाठी पाणी नियमित सोडले जात

तीन धरणांच्या कालव्यातून पाणीच नाही
- हितेन नाईक, पालघर
तालुक्यातील जलसंपदा-जलसंधारण विभागांतर्गत बांधण्यात आलेल्या झांजरोली, करवाळे आणि वांद्री धरणाच्या कालव्यांमधून शेतीसाठी पाणी नियमित सोडले जात नसून कालव्यांची कामेही पूर्णपणे निकृष्ट दर्जाची झाली आहेत. त्यामुळे असंख्य शेतकऱ्यांची पिके धोक्यात आली आहेत.
संबंधित अधिकारी आणि ठेकेदारांनी संगनमताने मोठा गैरव्यवहार केल्याने ही अवस्था ओढावल्याचा आरोप शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख आणि ज्येष्ठ नेते उदय पाटील यांनी केला असून, दोषींवर कारवाईची मागणी केली आहे. वांद्री धरण जल संपदा विभागांतर्गत तर करवाळे आणि झांजरोली धरण जलसंधारण विभागामार्फत बांधण्यात आले आहे. या धरणांच्या कालव्यांची कामे निकृष्ट झाल्याने तडे गेले आहेत. त्यामुळे याची सखोल चौकशी करून दोषींवर कडक कारवाईची मागणी मुख्यमंत्र्यांकडे करण्यात आली आहे.