वीजबील भरण्यासाठी वेगळा कक्ष नाही
By Admin | Updated: November 18, 2015 00:10 IST2015-11-18T00:10:29+5:302015-11-18T00:10:29+5:30
वसई पूर्व ग्रामीण भागातील चांदिप येथे असणाऱ्या दि ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत याच भागातील शेकडो ग्राहक आणि शासकीय योजनेचा लाभ घेणारे अनेक लाभार्थी

वीजबील भरण्यासाठी वेगळा कक्ष नाही
पारोळ : वसई पूर्व ग्रामीण भागातील चांदिप येथे असणाऱ्या दि ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत याच भागातील शेकडो ग्राहक आणि शासकीय योजनेचा लाभ घेणारे अनेक लाभार्थी येत असतात. पण येथे वीजबील भरणा, रक्कम काढणे, जमा करणे, धनादेश वटवणे या कामासाठी एकच कक्ष असल्यामुळे मोठ्या प्रमाणात ग्राहकांची गर्दी होते आणि परिणामी, त्यांची गैरसोय होते.
या शाखेत मोठा ग्राहक वर्ग असून कर्ज काढणे, शेतकरी सोसायटीचे कर्ज घेणे, प्राथमिक शिक्षकांचा पगार, शेतकऱ्यांना मिळणारी भरपाई, निराधार योजनेचे लाभार्थी रोज या शाखेत येत असतात. त्यामुळे त्यांना बसण्यासाठी जागा अपुरी पडते.
बँकेचे नूतनीकरण होत असून पूर्वी या शाखेत जागा कमी होती. आता ती वाढवण्यात येत असून वीजबील भरणा करण्यासाठी वेगळा कक्ष महिन्याभरात तयार होईल असे संचालक राजेश पाटील यांनी लोकमतला सांगितले. (वार्ताहर)