There is no pediatrician at Mokhada Hospital | मोखाडा रूग्णालयात बालरोगतज्ज्ञच नाही

मोखाडा रूग्णालयात बालरोगतज्ज्ञच नाही

मोखाडा : मोखाडा ग्रामीण रुग्णालयातील बालरोगतज्ज्ञ डॉ. दत्तात्रय शिंदे यांची महिना भरापूर्वी जव्हार येथे बदली झाल्याने कुणी बालरोगतज्ज्ञ देता का अशी म्हणण्याची वेळ तालुकावासियांवर आली आहे.

जव्हार येथील पतंगशहा कुटीर रूग्णालयात डॉ. रामदास मराड हे बालरोग तज्ज्ञ डॉक्टर म्हणून कार्यरत असताना डॉ. शिंदे यांचीही नियुक्ती करण्यात आली. तसेच एक महिना उलटूनही मोखाडा ग्रामीण रूग्णालयात बालरोगतज्ज्ञ नियुक्त करण्यात आलेला नसल्याने मोठी गैरसोय होत आहे. मोखाडा तालुक्याचे भौगोलिक क्षेत्र मोठे असून २५९ गावपाड्यांचा समावेश आहे. संपूर्ण तालुक्याच्या आरोग्याची काळजी घेणारे मोखाड्याचे एकमेव ग्रामीण रुग्णालयच असून या ठिकाणी उपचारासाठी येणाऱ्या रूग्णांची संख्या अधिक आहे. त्याचबरोबर गरोदर मातांचे प्रमाणही अधिक असून लहाने बालके तसेच नवजात बालकांवर योग्य उपचारासाठी बालरोगतज्ज्ञ आवश्यक आहे. मोखाडा तालुका कुपोषण व बालमृत्यूने पीडित असतानाही या ठिकाणी गेल्या महिन्याभरापासून बालरोगतज्ज्ञ डॉक्टर नाही.

याबाबत अधिक माहिती घेऊन लवकरच मोखाडा ग्रामीण रूग्णालयात बालरोगतज्ज्ञाची नेमणूक करू.
- कांचन वानरे, जिल्हाशल्य चिकित्सक, पालघर

Web Title: There is no pediatrician at Mokhada Hospital

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.