आधारकार्ड केंद्र नाही
By Admin | Updated: June 29, 2015 04:35 IST2015-06-29T04:35:32+5:302015-06-29T04:35:32+5:30
पालघर जिल्ह्यातील जव्हार, मोखाड्यातील आदिवासी ग्रामीण भागात गेल्या वर्षभरापासून आधारकार्ड काढण्यासाठी केंद्रच नसल्याने या तालुक्यातील लाखो नागरीक आधार कार्डापासून वंंिचत आहेत.

आधारकार्ड केंद्र नाही
जव्हार : पालघर जिल्ह्यातील जव्हार, मोखाड्यातील आदिवासी ग्रामीण भागात गेल्या वर्षभरापासून आधारकार्ड काढण्यासाठी केंद्रच नसल्याने या तालुक्यातील लाखो नागरीक आधार कार्डापासून वंंिचत आहेत. या तालुक्यातील नागरिकांनी तहसिलदारांकडे वारंवार तक्रारी करूनही आधारकार्ड केंद्र सुरू झालेले नाही. शासनाने आधारकार्ड ेसक्तीचे केल्याने शाळकरी विद्यार्थ्यांनाही आधारकार्डा शिवाय वस्तीगृहात प्रवेश नाही. जव्हार, मोखाडा येथे एकही आधारकेंद्र नसल्याने नागरिकांची मोठी गैरसोय झाली आहे. त्यामुळे जव्हार, मोखाडा येथील अनेक पालकवर्गाला आधारकार्ड काढण्यासाठी वेळ व भाडे खर्चून विक्रमगड येथे जावे लागते आहे.
पालघर जिल्ह्यातील जव्हार, मोखाडा, विक्रमगड या तीन तालुक्यापैकी फक्त विक्रमगड येथेच आधारकार्ड केंद्र आहे. त्यामुळे विक्रमगड येथे पालक व शाळकरी विद्यार्थ्याच्या रांगा लागत आहे. येथे गर्दी होऊ नये म्हणून काही नागरीकांना वेळ व तारीख देऊनही त्यांचे आधारकार्ड काढले जात नसल्याच्या तक्रारी होत आहेत. त्यामुळे जव्हार, मोखाड्यातील लाखो नागरीक आधारकार्डपासून वंचित आहेत. जव्हार, मोखाडा येथे आधारकेंद्र चालू करावी अशी मागणी तहसीलदारांकडे नागरीकांनी केली आहे. (वार्ताहर)