शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुतीमध्ये २०७ जागांवर एकमत, कोण किती जागा लढवणार? अमित साटमांनी सांगितला आकडा
2
भयंकर हिमवृष्टीमुळे अमेरिकेला हुडहुडी;  न्यूयॉर्क, न्यूजर्सीमध्ये आणीबाणी, १६ हजार विमान उड्डाणांवर परिणाम  
3
'पुष्पा २' प्रीमियर चेंगराचेंगरी प्रकरणात अभिनेता अल्लू अर्जुनसह २३ जण दोषी, आरोपपत्र दाखल
4
ठाण्यात मनसेला मोठा धक्का, राजन गावंड यांचा शिंदेसेनेत जाहीर प्रवेश   
5
जम्मू काश्मीर: ३० ते ३५ दहशतवादी लपल्याची शंका, बर्फवृष्टीतही भारतीय सैन्याची शोधमोहिम सुरु
6
भररस्त्यात पाठलाग करून मंगेश काळोखेंवर केले २७ वार; आरोपींच्या निर्दयीपणाचे 'सीसीटीव्ही' फुटेज समोर
7
’मंगेश काळोखे यांच्या मारेकऱ्यांवर मोक्का लावून कठोरात कठोर कारवाई करणार’, एकनाथ शिंदे यांचं आश्वासन
8
मैदानातच आला हृदयविकाराचा झटका, प्रसिद्ध प्रशिक्षकाचं निधन, बांगलादेश क्रिकेटवर शोककळा  
9
भाजपा, शिंदेसेनेत युतीसाठी कोणतीही अडचण नाही; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची स्पष्टोक्ती
10
VIDEO: खतरनाक! समुद्राच्या तळाशी पोहणाऱ्या डायव्हरवर अचानक ऑक्टोपसने केला हल्ला अन् मग...
11
ठाण्यात तीन प्रभागावरून युती अडली; आज तोडगा निघण्याची शक्यता, १२ जागांवरून अडले घोडे
12
Solapur Municipal Election: काँग्रेसने २० उमेदवारांच्या नावाची केली घोषणा, पहिल्या यादीत कुणाची नावे?
13
खोपोलीतील घटना अत्यंत निंदनीय, निषेध करत सुनिल तटकरे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली मोठी मागणी
14
"PM मोदींचा हा वन मॅन शो फक्त..."; मनरेगाच्या नामांतरावरून सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल, काँग्रेस ५ जानेवारीपासून रस्त्यावर उतरणार
15
VIDEO : इटलीच्या बॅटरकडून शाहीन आफ्रिदीची धुलाई; पाक गोलंदाजावर 'लंगडी' घालत मैदान सोडण्याची वेळ!
16
शिंदेसेनेच्या बैठकीत राडा? शहरप्रमुख नाना भानगिरे रागारागात बाहेर पडले आणि गेले निघून; व्हिडीओ आला समोर
17
जळगाव: बापच बनला हैवान! चौथी मुलगी झाल्याच्या रागातून अवघ्या ३ दिवसांच्या मुलीची हत्या
18
बांगलादेशमध्ये एका मिस्ट्री गर्लची एंट्री, बनू शकते भविष्यातील शेख हसीना किंवा खलिदा झिया
19
Sukesh Chandrashekhar : "२१७ कोटी देण्यास तयार, पण...", महाठग सुकेश चंद्रशेखरचा मास्टरस्ट्रोक; खंडणी प्रकरणात मोठी ऑफर
20
AUS vs ENG: डोक्यात निवृत्तीचा विचार, मनात भीती… आणि त्यानेच सामना फिरवला!
Daily Top 2Weekly Top 5

फडणवीसांच्या प्रचारसभेदरम्यान फोटोग्राफरला कार्यकर्त्यांच्या गर्दीने पायदळी तुडवले!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 15, 2024 00:03 IST

Lok Sabha Election 2024 : फडणवीस व्यासपीठाकडे गेल्यानंतर महायुतीच्या पदाधिकाऱ्यांनी व्यासपीठाकडे मोर्चा वळवला.

- अनिरुद्ध पाटील

पालघर लोकसभेसाठी महायुतीचे भाजपचे उमेदवार डॉ. हेमंत सावरा यांच्या प्रचार सभेसाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मंगळवार, १४ मे रोजी पावणेपाचच्या सुमारास डहाणूत पोहचले. मात्र त्यांच्या भेटीसाठी आतुर महायुतीचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी एकच गर्दी केली. फडणवीस व्यासपीठाकडे गेल्यानंतर महायुतीच्या पदाधिकाऱ्यांनी व्यासपीठाकडे मोर्चा वळवला.  छोट्या मार्गाने फडणवीस आत आले, त्यांच्यासह पदाधिकारी आणि घटकपक्षाच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी व्यासपीठाकडे जाण्यासाठी मोर्चा वळवला. त्याचा फटका सुरक्षारक्षक आणि उपमुख्यमंत्र्याच्या फोटोग्राफर टीमच्या सदस्याला बसला. गर्दीत अडकलेला फोटोग्राफर जमिनीवर पडला. यानंतर त्याच्या अंगावरून काहीजण गेल्याने त्याला मुकामार बसल्याने तो ओरडला. त्यावेळी त्याला पोलीस आणि काही पदाधिकाऱ्यांनी व्यासपीठाच्या पूर्वेकडील पायऱ्यांवर बसवले. 

काही काळ विश्रांती घेतल्यानंतर तो फोटोग्राफर पुन्हा आपली कामगिरी बजावताना दिसून आला. तर सुरक्षारक्षकाने स्वतःला सावरत आपले कर्तव्य बजावण्यात धन्यता मानली. दरम्यान या सभेत पालकांसह आलेला लहान मुलगा हरवला होता, काही अवधीनंतर तो सापडला असल्याचे डहाणू पोलिसांनी सांगितले.

टॅग्स :palghar-pcपालघरDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसmaharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४