वाढवण बंदराचे नाव कायमचे पुसणार : ठाकरे

By ऑनलाइन लोकमत | Published: April 13, 2024 08:02 AM2024-04-13T08:02:47+5:302024-04-13T08:03:04+5:30

वाढवण बंदरविरोधी लढ्याला ताकद देण्यासाठी उद्धव ठाकरे काय घोषणा करतात? हे ऐकण्यासाठी स्थानिक शेतकरी, मच्छीमार मोठ्या संख्येने उपस्थित होते

The name of the port will be erased forever: Thackeray | वाढवण बंदराचे नाव कायमचे पुसणार : ठाकरे

वाढवण बंदराचे नाव कायमचे पुसणार : ठाकरे

लोकमत न्यूज नेटवर्क
बोईसर/पालघर : तुम्ही महाविकास आघाडीला मतदान करून सत्ता आमच्या हाती द्या, वाढवण बंदराचे नाव कायमचे पुसून टाकतो, असे वचन उद्धवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बोईसर येथील आंबटगोड मैदानात महाविकास आघाडीच्या जाहीर सभेत उपस्थित जनसमुदायाला दिले. 

वाढवण बंदरविरोधी लढ्याला ताकद देण्यासाठी उद्धव ठाकरे काय घोषणा करतात? हे ऐकण्यासाठी स्थानिक शेतकरी, मच्छीमार मोठ्या संख्येने उपस्थित होते. वाढवण बंदराला बाळासाहेब ठाकरेंनी विरोध करीत तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर जोशी यांना बंदर रद्द करायला लावले. असे असताना बाळासाहेबांनी बंद केलेला विषय पुन्हा कोणी बाहेर काढला? रद्द केलेल्या बंदराच्या विषयात हवा कुणी भरली? असे प्रश्न त्यांनी उपस्थित केले. वाढवण बंदरामुळे कोणाचा विकास होणार, असा प्रश्न ठाकरे यांनी उपस्थित जनसमुदायाला विचारताच ‘अदाणी, अदाणी’ असा एकच नारा सभेतून निघाला. प्रचार सभेला खा. संजय राऊत, आ. विनोद निकोले, आ. सुनील भुसारा, सीपीएमचे कार्यकारी अध्यक्ष अशोक  ढवळे, महाआघाडीतील काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष प्रफुल पाटील, शरद पवार गटाचे अनिल गावड, वाढवण बंदरविरोधी संघर्ष समितीचे अध्यक्ष नारायण पाटील, कष्टकरी संघटनेचे ब्रायन लोबो आदी उपस्थित होते.

 

Web Title: The name of the port will be erased forever: Thackeray

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.