शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
2
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
3
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
4
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
7
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
8
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
9
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
10
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
11
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
12
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
13
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
14
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
15
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
16
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
17
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
18
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
19
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
20
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
Daily Top 2Weekly Top 5

हत्येच्या गुन्ह्यात फरार असणाऱ्या मुख्य आरोपीला यूपीतून केली अटक, पेल्हारच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेला यश

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2024 17:14 IST

...याप्रकरणी पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करून गुन्ह्याच्या तपासाला सुरुवात केली होती.

मंगेश कराळे -

नालासोपारा - हत्येच्या गुन्ह्यातील फरार मुख्य आरोपीला पेल्हारच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेतील पोलिसांनी यूपीतून अटक केल्याची माहिती जनसंपर्क अधिकारी प्रवीण बनगोसावी यांनी शुक्रवारी दिली आहे.

कांदिवलीच्या मारुती चाळीत राहणारा सुधीर सिंग (२७) आणि वालईपाडा रोडवरील उपाध्याय चाळीत राहणारा वैभव मिश्रा (२८) हे दोघे १२ जानेवारीला गौराईपाडा परिसरात रूम बघण्यासाठी गेले होते. यावेळी आरोपींनी त्याचे अपहरण करून गौराईपाडा परिसरातील यादवेश विद्यालयाच्या बाजूला असलेल्या पार्किंगच्या मोकळ्या जागेत आरोपींनी अंगावर कोयता, दुसरे धारदार हत्याराने वार करून लाकडी बांबू व लाथाबुक्यांनी मारहाण करून जीवे ठार मारले होते. 

याप्रकरणी पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करून गुन्ह्याच्या तपासाला सुरुवात केली होती. पेल्हारच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पोलिसांनी आरोपी सूरज चव्हाण (२५), साहिल विश्वकर्मा (२१) आणि अखिलेश सिंग (२७) या तिन्ही आरोपींना १२ जानेवारीला पुण्याच्या सिंहगड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आनंद नगर परिसरातून पळून जात असताना पाठलाग करून शिताफीने पकडले होते. पण सदर गुन्हा घडल्यापासुन या गुन्हयातील मुख्य आरोपी राहुल पाल ऊर्फ मर्दा हा फरार झाला होता.

गुन्हयातील मुख्य आरोपी राहुलचा शोध घेण्यासाठी वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र वनकोटी यांनी आदेश दिले होते. सदर आदेशान्वये पेल्हारचे गुन्हे प्रकटीकरण शाखेचे अधिकारी/अंमलदार यांनी फरार आरोपी याच्याबाबत तांत्रिक माहिती प्राप्त केली. आरोपी हा राज्य उत्तर प्रदेश येथे असण्याची शक्यता असल्याने पेल्हार पोलीस त्याचा शोध घेण्यासाठी भदोई येथे गेले. 

भदोई जिल्ह्यातील चौरीबाजार या ठिकाणी आरोपीबाबत अधिकची माहिती प्राप्त करुन तो रामपूर येथे असल्याची खात्रीशिर माहिती मिळाली. त्यानुसार पोलीस पथकाने तात्काळ रामपूर येथील पोलीसांच्या मदतीने आरोपीचा साकरी या गावात रात्रौवेळेस शोध घेत असताना त्याला पोलीसांची चाहूल लागल्याने तो जंगलात पळून जात असताना त्याचा पाठलाग करुन त्यांना अटक केली.

सदरची कामगिरी पोलीस उपायुक्त जयंत बजबळे, सहायक पोलीस आयुक्त बजरंग देसाई यांचे मार्गदर्शनाखाली पेल्हारचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र वनकोटी, पोलीस निरीक्षक (गुन्हे) कुमारगौरव धादवड, गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सपोनि सोपान पाटील, पोउपनिरी तुकाराम भोपळे, पोहवा योगेश देशमुख, तानाजी चव्हाण, अविनाश देसाई, फिरोज तडवी, अनिल शेगर, वाल्मिक पाटील, रवि वानखेडे, संजय मासाळ, मिथुन भोईर, निखील मंडलिक, किरण आव्हाड, राहुल कर्पे, दिलदार शेख, अनिल साबळे, शरद राठोड, सुजय पाटील, नामदेव ढोणे, सोहेल शेख यांनी पार पाडली आहे. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस