शहरं
Join us  
Trending Stories
1
तामिळनाडू हादरलं! कडलूरमध्ये भीषण अपघात; भरधाव बसने दोन कारना चिरडले, ९ जणांचा मृत्यू
2
तारिक रहमान परतण्यापूर्वी बांगलादेशात पुन्हा हिंसाचार उफाळला; ढाका बॉम्बस्फोटात एकाचा मृत्यू
3
उद्धवसेना-मनसे युतीची घोषणा; १९ वर्षांनी उद्धव आणि राज दोन्ही भाऊ आले एकत्र; या प्रश्नांचे काय?
4
संपादकीय: निवडणूक कामात शिक्षकच का? समोर दहावी, बारावीच्या परीक्षाही...
5
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २५ डिसेंबर २०२५: आनंदाची बातमी मिळेल, कुटुंबातील वातावरण सुखावह राहील!
6
अखेर ठाकरेयुती! बदलेल ‘राज’नीती?  कोणत्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज-उद्धव काय म्हणाले...
7
‘निवडून आलो, तर पक्ष बदलणार नाही’, असे लिहून देता का?
8
थेट निवडलेल्या नगराध्यक्षास सदस्यत्व, मताचाही अधिकार; मंत्रिमंडळाचा निर्णय 
9
मोठा धक्का! बीकेसीतील बुलेट ट्रेन स्थानकाचे काम तात्काळ थांबवण्याची नाेटीस
10
देशातील हवाई वाहतूक क्षेत्रात आणखी दोन नव्या कंपन्यांची एन्ट्री; हिंद एअर, फ्लाईएक्स्प्रेसला केंद्र सरकारकडून मंजुरी
11
‘त्या’ कुटुंबाची जबाबदारी बांगलादेश सरकारने स्वीकारली
12
सुट्टीसाठी तळमळणाऱ्या मंत्र्यांना ‘डिसेंबर’ हुडहुडी!
13
जिथे नेटवर्क नाही, तिथेही मोबाइल चालणार; आपत्तींतही इंटरनेट मिळेल
14
बिहार संघाने नोंदवली विश्वविक्रमी धावसंख्या; वैभवने चोपल्या १९० धावा, त्याही एवढ्याच चेंडूत...
15
विजय हजारे स्पर्धेत विक्रमच विक्रम, एकाच दिवसात दोन दीड शतके, दोन स्फोटक शतके...
16
वायुप्रदूषण असेच कायम राहिल्यास बांधकामे थांबवण्याचे आदेश देऊ! मुंबई उच्च न्यायालयाचा महापालिकेला इशारा
17
कमी मद्यपानामुळेही तोंडाच्या कर्करोगाचा धोका; ‘टाटा मेमोरियल’च्या अभ्यासातील निष्कर्ष
18
घरांच्या विक्रीला ‘ब्रेक’; पुणे, मुंबईत मोठी घसरण; नव्या विमानतळामुळे...
19
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
20
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
Daily Top 2Weekly Top 5

दुहेरी हत्यांकाडातील मुख्य आरोपीला १६ वर्षानंतर अटक, नालासोपारा गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पोलिसांना यश

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2025 00:00 IST

Nalasopara Crime News: नालासोपारा शहरातील दुहेरी हत्यांकाडातील मुख्य आरोपीला १६ वर्षानंतर अटक करण्यात नालासोपारा गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पोलिसांना यश मिळाले आहे.

- मंगेश कराळेनालासोपारा -  शहरातील दुहेरी हत्यांकाडातील मुख्य आरोपीला १६ वर्षानंतर अटक करण्यात नालासोपारा गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पोलिसांना यश मिळाले आहे. २९ एप्रिल ते २ मे २००९ साली बिलालपाडा येथील खंडोबा मंदीरा जवळ विनोद शंकरलाल जयस्वाल (३८) हे आरोपी कैलास ललन यादव, विनय उर्फ अजय, धर्मेद्र सोनी आणि किरण सोनी या चौघांनी मिळुन दलालीचे पैसे घेण्याकरीता आला होता. आरोपींनी आपसात संगनमत करुन त्याचे हातपाय नायलॉनचे दोरीने व साडीने बांधुन गमचाने (टॉवेलने) गळा आवळुन तोंडा भोवती कपडा गुंडाळून जिवे ठार मारले होते. नालासोपारा पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला होता. वरिष्ठांनी दिलेल्या आदेशानुसार या गुन्ह्यातील मुख्य फरार आरोपीचा शोथ घेण्यासाठी गुन्हे प्रकटीकरण पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी तपास सुरू केला.

आरोपी हा अपराध केल्यापासुन आपली ओळख लपवुन तो इटारसी, भोपाळ मध्यप्रदेश येथे राहत होता. तांत्रिक विश्थेलण व बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीनुसार नायगाव पूर्वेकडील परीसरात सापळा रचून मुख्य आरोपी अविनाश लालताप्रसाद सोनी (४२) याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे केलेल्या तपासात नमूद गुन्ह्याची कबूली दिल्याने त्याला सोमवारी रात्री साडे दहा वाजण्याच्या सुमारास अटक केली. आरोपीने चौकशीदरम्यान आझमगड उत्तरप्रदेश येथे सन १९९८ मध्ये खुन केल्याची कबुली दिलेली आहे. त्या गुन्ह्याची पोलीस माहिती घेत आहेत.

सदरची कामगिरी पोलीस आयुक्त निकेत कौशिक, अपर पोलीस आयुक्त दत्तात्रय शिंदे, पोलीस उपायुक्त सुहास बावचे, सहाय्यक पोलीस आयुक्त सुनिल जायभाये यांच्या मार्गदर्शनाखाली नालासोपाऱ्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विशाल वळवी, पोलीस निरीक्षक (गुन्हे) कुमारगौरव थादवड, सपोनि राजेंद्र चंदनकर, पोउपनि रंगनाथ गिते, पोहवा प्रशांत साळुंके, अमोल तटकरे, कल्याण बाचकर, राजेश नादुलकर, प्रेम घोडेराव, प्रताप शिंदे आणि बाबासाहेब बनसोडे यांनी केलेली आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Key Suspect in Double Murder Arrested After 16 Years

Web Summary : After 16 years, police arrested Avinash Lalataprasad Soni, the main suspect in a 2009 double murder case in Nalasopara. He confessed to the crime and a 1998 murder in Uttar Pradesh. Police are investigating further.
टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीVasai Virarवसई विरार