शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
4
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
5
मिरा-भाईंदरमधील उड्डाणपूलाचा आकार बाटलीसारखा का? एमएमआरडीएच्या कामावर फडणवीसांचं स्पष्टीकरण
6
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
7
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
8
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
9
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
10
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
11
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
12
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
13
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
14
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
15
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
16
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
17
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
18
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
19
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

उमेदवारी जाहीर नाही, मात्र प्रचाराला सुरुवात!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2024 08:34 IST

गावित लढणार, भाजप की शिंदेसेना?

हितेन नाईकलोकमत न्यूज नेटवर्क पालघर : पालघर लोकसभेचे खासदार राजेंद्र गावित हे शिंदेसेनेकडून, की भाजपमधून निवडणूक लढविणार, हे अजून नक्की झाले नसले तरी त्यांनी मतदारसंघात मतदारांच्या गाठीभेटी घेत आपला प्रचार सुरू केला आहे. त्यांच्यासोबत शिंदेसेनेचे पदाधिकारी फिरत असले तरी भाजप पदाधिकाऱ्यांनी मात्र फिरणे टाळल्याचे दिसून येत आहे.

पालघर लोकसभेच्या २०१९ च्या निवडणुकीत शिवसेनेच्या राजेंद्र गावित (५,८०,४७९ मते) यांनी बहुजन विकास आघाडीच्या बळीराम जाधव (४,९१,५९६ मते) यांचा ८८ हजार ८८३ मतांनी पराभव केला होता. पूर्वी पालघर जिल्ह्याचा उत्तर मुंबई मतदारसंघात समावेश होता. १९८९ ला राम नाईकांच्या रूपाने पालघर जिल्ह्यात भाजपचे प्रतिनिधित्व केले होते. त्यानंतर राम नाईक ५ वेळा, चिंतामण वनगा ३ वेळा, तर राजेंद्र गावित एक वेळा, अशा नऊ वेळा भाजपच्या उमेदवाराला मतदारांनी स्वीकारले होते.

 चार मतदारसंघांत  एकाच उमेदवाराची  घोषणा...  पालघर लोकसभेवर सध्या शिंदेसेनेचे राजेंद्र गावित हे खासदार आहेत. या वेळच्या निवडणुकीत पालघर लोकसभेवर भाजप आणि शिवसेना या दोन्ही सत्ताधारी पक्षांनी आपला दावा केला आहे. पालघरची जागा भाजप सोडायला तयार नसल्याने भाजपच्या चिन्हावर राजेंद्र गावितांना उमेदवारी देण्याची व्यूहरचना आखली जात असल्याची माहिती भाजपच्या गोटातून मिळत आहे. 

एक गट विरोधात, एक गट बाजूनेभाजपचे पालघर जिल्हाध्यक्ष भरत राजपूत यांच्यासह अन्य काही पदाधिकाऱ्यांचा राजेंद्र गावितांना विरोध असला तरी भाजपमधील एक गट राजेंद्र गावितांना तिकीट देण्याच्या बाजूने आहे. दुसरीकडे काँग्रेसमधून राजेंद्र गावितांना २०१८ च्या निवडणुकीत भाजपमध्ये आणण्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची मुख्य भूमिका राहिल्याने गावितांना मध्येच अधांतरी सोडण्यास फडणवीस राजी नसल्याचेही कळते.

टॅग्स :palghar-pcपालघरBJPभाजपाShiv Senaशिवसेनाlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४Maharashtra Budgetमहाराष्ट्र बजेट 2024