सहृदय संयोजकांना पालघरवासीयांचे धन्यवाद
By Admin | Updated: October 24, 2016 01:54 IST2016-10-24T01:54:49+5:302016-10-24T01:54:49+5:30
रविवारचा मोर्चा लाखाचे सीमोल्लंघन करेल, असा संयोजकांना असलेला जबरदस्त आत्मविश्वास आणि त्यानुसार पोलिसांनी तैनात केलेला जोरदार फौजफाटा त्यामुळे

सहृदय संयोजकांना पालघरवासीयांचे धन्यवाद
शुभदा सासवडे , पालघर
रविवारचा मोर्चा लाखाचे सीमोल्लंघन करेल, असा संयोजकांना असलेला जबरदस्त आत्मविश्वास आणि त्यानुसार पोलिसांनी तैनात केलेला जोरदार फौजफाटा त्यामुळे शहराला आलेले छावणीचे स्वरूप हे सारे लक्षात घेऊन रविवारी शहरात जवळजवळ अघोषित संचारबंदीसदृश वातावरण होते. परंतु, संयोजकांनी २५६ जणांचा एक असे २६ ग्रुप करून रातोरात सर्व व्यापारी संघटना असोसिएशन, पोलीस दल व प्रशासनाला रविवारी सकाळी १२ पर्यंत शहरातील व्यवसाय सुरू ठेवण्याचे आवाहन केले. त्यामुळे शहरवासीयांना सुखद धक्का बसला आणि संपूर्ण शहरातील व्यवहार व जनजीवन सुरळीत सुरू होते. त्यामुळे पोलिसांना विश्रांती घेण्याचेच काम उरले होते. ड्युटीवर असले तरी कोणताही तणाव त्यांच्या चेहऱ्यावर जाणवत नव्हता. ज्यांची रोजीरोटी हातावर होती, त्या फेरीवाल्यांनीही या सहृदयतेबद्दल मोर्चाच्या संयोजकांचे मन:पूर्वक धन्यवाद दिले.