तलासरी नगर पंचायतीला बाळसे चढता चढेना
By Admin | Updated: June 16, 2016 00:37 IST2016-06-16T00:37:56+5:302016-06-16T00:37:56+5:30
येथील ग्रामपंचायत बरखास्त करून नगर पंचायत अस्तित्वात येऊन एक महिना झाला तरी बाळसे धरीत नसल्याने विकास कामेही ठप्प झाली आहेत.

तलासरी नगर पंचायतीला बाळसे चढता चढेना
तलासरी : येथील ग्रामपंचायत बरखास्त करून नगर पंचायत अस्तित्वात येऊन एक महिना झाला तरी बाळसे धरीत नसल्याने विकास कामेही ठप्प झाली आहेत.
सध्या शाळा कॉलेज सुरु झाल्याने विद्यार्थ्यांना विविध दाखल्याची गरज आहे. परंतु पंचायतीचेच कामकाज विस्कळीतच असल्याने नागरिकांना ते उपलब्ध होत नाहीत अनुभवी कर्मचारी व स्टेशनरी उपलब्ध होताच कामकाज सुरु होईल असे नगर पंचायत प्रशासनाकडून सांगण्यात येत असले तरी महिना झाल्या नंतरही कशाचाच पत्ता नाही. तलासरी नगर पंचायतीच्या ढिसाळ कारभराबाबत राष्ट्रवादी काँग्रेस ने आक्र मक भूमिका घेतली असून प्रशासनाने आपला कारभार न सुधारल्यास राष्ट्रवादी काँग्रेस तर्फेठिय्या आंदोलन करण्यात येणार असल्याबाबतचे पत्र जिल्हा परिषद सदस्य काशिनाथ, चौधरी तालुका अध्यक्ष सुधीर ओझरे यांनी कार्यकर्त्यांसह तहसीलदारांना दिले. (वार्ताहर)