रेती वाहतुकीचे बनावट परवाने, २ अटकेत

By Admin | Updated: February 22, 2016 00:22 IST2016-02-22T00:22:54+5:302016-02-22T00:22:54+5:30

वैतरणा रेती बंदरामध्ये बोगस परवाने असल्याचे उघड झाले असून रेती वाहतूकदाराला ते देतांना राजू मधुकर म्हात्रे व यज्ञेश्वर मोतीलाल भगतरा. फणसपाडा यांना महसूल अधिकाऱ्यांनी

Textile licenses for sand transport, 2 arrests | रेती वाहतुकीचे बनावट परवाने, २ अटकेत

रेती वाहतुकीचे बनावट परवाने, २ अटकेत

- सुनिल घरत,  पारोळ
वैतरणा रेती बंदरामध्ये बोगस परवाने असल्याचे उघड झाले असून रेती वाहतूकदाराला ते देतांना राजू मधुकर म्हात्रे व यज्ञेश्वर मोतीलाल भगतरा. फणसपाडा यांना महसूल अधिकाऱ्यांनी पकडून विरार पोलिसांच्या ताब्यात दिले.
सूत्रांनी दिलेल्या माहितीवरुन १८ फेब्रुवारीला मंडळ अधिकारी सोनावणे यांचे गौण खनिज तपासणी पथक कणेर फाट्यावर तैनात होते. स. ११ वाजता त्यांना या ठिकाणी रेतीचे परवाने दिले जात असल्याचे अज्ञात ट्रक चालकाने सांगितले.
महसूल अधिकाऱ्यांनी तात्काळ त्या ठिकाणी पोहचून त्या व्यक्तींकडे असणाऱ्या परवान्याची तपासणी केली असता ते बोगस असून त्यावरील महसूल विभागाचा शिक्का ही बनावट असल्याचे निष्पन्न झाले. याबाबत सोनावणे यांनी कणेर चौकीत तक्रार दाखल करताच पोलिसांनी या दोघांना अटक केली. वैतरणा बंदरातील रेती वाहतूक परवाना हा २६०० रु. एक ब्रास असा असून हे बनावट परवाने हुबेहुब छापल्याने महसूल विभागाच्या डोळ्यात धूळ फेकत अनेक दिसत हा गोरखधंदा सुरु असल्याचे समोर आले आहे. तसेच या दोन स्थानिक युवकांना बनावट पद्धतीने परवाने छापून देणारा तिसरा आरोपी फरार आहे. या दोघांना फसवणुकीचा कलमाखाली अटक केली असून त्यांना ४ दिवसाची पोलीस कोठडी दिल्याचे उपनिरीक्षक डोंबाळे यांनी लोकमतला सांगितले.

Web Title: Textile licenses for sand transport, 2 arrests

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.