शहरं
Join us  
Trending Stories
1
Ajit Pawar : 'पवार साहेबांच्या तब्येतीची काळजी घ्यायला हवी होती, मी जर त्यांच्याबरोबर... '; अजितदादांनी सांगितला २००४ चा प्रसंग
2
आदित्य ठाकरेंचा भाजपा-मनसेवर हल्लाबोल; "ज्यांनी परप्रांतीयांना मारलं अशा मनसेचा..."
3
'मालेगावचा कट करकरेंमुळे उघडा पडला अन्...'; २६/११ चा उल्लेख करत ठाकरे गटाचा मोठा दावा
4
वांद्रे-वरळी सी-लिंक मुख्यमंत्र्यांच्या ताफ्याचा पाठलाग; आरोपी तरुणाला थांबविण्यासाठी रंगला थरार
5
HDFC च्या कोट्यवधी ग्राहकांसाठी मोठी बातमी! Car आणि Home Loan च्या ग्राहकांवर होणार परिणाम
6
'त्या' ५ जागांबाबत राजनाथ सिंह आणि शरद पवारांमध्ये फोनवरून चर्चा; प्रकाश आंबेडकरांचा दावा
7
पवार वि. पवार वादाला मतदार कंटाळला; बारामतीत टक्का घसरला
8
आजचे राशीभविष्य - ८ मे २०२४; धन - मान - सन्मान मिळतील, सरकार कडून फायदा होईल
9
ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजप सरकार कोसळणार? हरयाणामध्ये तीन अपक्ष आमदारांनी काढला पाठिंबा
10
तीन ईव्हीएम जाळण्याचा प्रयत्न; तरुणावर गुन्हा दाखल; सोलापूर जिल्ह्यातील बागलवाडी येथील बूथवरील प्रकार
11
‘सेक्स स्कँडल’च्या २५,००० पेन ड्राइव्हचे पोलिसांनीच वाटप केले; कुमारस्वामी यांचा आरोप, मोदीही प्रथमच बोलले
12
अरविंद केजरीवाल यांना जामीन देण्यास सुप्रीम कोर्ट अनुकूल; पण...
13
'तुला सहानंतर कोण आहे? बारामतीचा कोण येत नाही'; आमदार दत्ता भरणेंची शरद पवार गटाच्या कार्यकर्त्याला शिवीगाळ
14
मतदानाच्या दिवशी बारामतीत नात्यांचा ट्विस्ट, सुप्रिया सुळेंनी घेतली अजित पवारांच्या आईची भेट; तर अजित पवार म्हणाले... मेरी माँ मेरे साथ है!
15
‘मुस्लीम आरक्षण’ नवा मुद्दा; प्रचारात होतोय वारंवार उल्लेख, मोदींच्या जाळ्यात विरोधक अडकले
16
१० लाख इनाम असलेल्या बासित दारसह ४ अतिरेकी चकमकीत ठार
17
४ जून ‘इंडिया आघाडी’ची एक्स्पायरी डेट : पंतप्रधान मोदी 
18
घराण्याचा वारसा जिंकणार की नव्या चेहऱ्याला कौल मिळणार? विखे-लंके लढत : महसूलमंत्र्यांची प्रतिष्ठा पणाला
19
‘बंगाली प्राइड’वर अन् विकास-अराजकतेमध्ये संघर्ष; दक्षिण बंगालच्या जागांवर तृणमूलची मदार
20
डाॅक्टरांच्या मनाईनंतरही धोनी खेळतोय आयपीएल; याच्या मांसपेशी फाटल्या

मेनोरी खाडीवर पुलाच्या कामाची निविदा

By ऑनलाइन लोकमत | Published: July 28, 2019 9:33 PM

याआधी जेट्टीच्या आड पुलाचे बांधकाम होत असल्याचा ग्रामस्थांनी केला होता आरोप

ठळक मुद्देयाआधी मेरी टाईम बोर्डाने जेट्टीच्या नावाखाली पुलाचे बांधकाम सुरु असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला होता.गोराई येथील जेट्टीचे काम देखील बंद पाडण्यात आले होते.

मीरारोड - मनोरी खाडीवर पुल बांधण्यासाठी मुंबई महापालिकेने निविदा काढली असून त्याचा ग्रामस्थांच्या विविध संघटनांनी निषेध केला आहे. याआधी मेरी टाईम बोर्डाने जेट्टीच्या नावाखाली पुलाचे बांधकाम सुरु असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला होता. पण महापालिकेने मुलाच्या कामासाठी निवीदा कढल्याने ग्रामस्थांनी पुन्हा आंदोनाचा पावित्रा घेतला आहे. मनोरी, गोराई, उत्तन भागात बडड्या उद्योजकांपासून राजकारणी आणि बिल्डरांनी जमिनी घेतल्या असून त्यांच्या फायद्यासाठी शासन, पालिका आणि राजकारणी पुल बांधण्याचा घाट सातत्याने घालत आल्याचा आरोप ग्रामस्थांनी केलाय.मुंबई हद्दीतील गोराई व मनोरी खाडीवर पुल बांधण्यास स्थानिक जागरुक ग्रामस्थांसह विविध संघटनांचा तीव्र विरोध आहे. त्यासाठी सातत्याने गावकरी आंदोलन करत आले आहेत. त्यातच आता मुंबई महापालिकेने मनोरी खाडीवर पुल बांधण्यासाठी निवीदा मागवल्या आहेत. या आधी मेरी टाईम बोर्डाने दोन्ही ठिकाणी रो रो सेवेच्या नावाखाली जेट्टी बांधण्याचे काम मंजुर केले. मनोरी येथील जेट्टीचे काम तर पुला सारखेच असल्याचा आरोप करत ते ग्रामस्थांनी बंद पाडले होते. गोराई येथील जेट्टीचे काम देखील बंद पाडण्यात आले होते.मुंबई , ठाण्यातील गावं बिल्डर, राजकारणी यांनी शहरीकरणाच्या नावाखाली बक्कळ फायद्यासाठी नामशेष केली आहेत. तर बडे उद्योजक, राजकारणी, बिल्डर आदींनी गेल्या अनेक वर्षांपासून गोराई, मनोरी सह भार्इंदरच्या उत्तन, डोंगरी, चौक, पाली, तारोडी गावच्या धारावी बेटावरील गावं उध्वस्त करण्याचा घाट घातला आहे. येथील नैसिर्गक पर्यावरणा सह जीवसृष्टीचे सरंक्षण व्हावे , भूमिपुत्रांचे आणि गावांचे अस्तित्व कायम टिकून रहावे , गावची संस्कृती कायम रहावी अशी भुमिका या विरोधा मागे धारावी बेट बचाव सह अन्य संघटनांनी सातत्याने मांडली आहे.पुल झाल्यास येथील शहरीकरणासह गुन्हेगारी देखील वाढणार आहे. येथील शांतता व पर्यावरण नष्ट होणार आहे. अवास्तव बांधकामे फोफावणार आहेत. मुळात या ठिकाणी एस्सेल वर्ल्ड सारखे बडे उद्योजक तसेच राजकारणी, बिल्डर आदींनी मोठ्या प्रमाणात जमीनी खरेदी केल्या असुन त्या विकासासाठी मोकळ्या करण्या करता तसेच त्यांच्या फायद्या करता शासन, पालिका आणि राजकारणी सातत्याने पुल बनवण्याचा घाट घालत असल्याचा आरोप समितीचे जॉजफ घोन्सालवीस, संदिप बुरकेन, ल्युड डिसोझा आदींनी केला आहे.शासन, राजकारणी केवळ गोराई आणि मनोरी खाडीवर पुल बांधण्याचा सातत्याने उपद्व्याप करत आले आहेत. पण या गावां मध्ये अद्यावत रु ग्णालय, महाविद्यालय , उद्याने - मैदाने, चांगली परिवहन सेवा आदी सुविधा देण्याची मात्र यांची दानत नाही. गाव परिसरातच स्थानिकांना रोजगार - उद्योगासाठी हे कोणतेही प्रयत्न करत नाहित. गेल्या अनेक वर्षांपासून सतत निवेदने - मागण्या करुन देखील त्या बद्दल हे अवाक्षर काढत नाहित. परंतु रो - रो सेवा , पूल , पर्यटन आराखडा, एसईझेड आदींची ग्रामस्थांनी मागणी नसताना देखील सुपाऱ्या घेऊन आमच्यावर लादत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केलाय .

टॅग्स :Muncipal Corporationनगर पालिकाMorchaमोर्चाmira roadमीरा रोड