तहसीलदारांच्या नावाने दहा लाखांची लाच
By Admin | Updated: March 3, 2016 01:59 IST2016-03-03T01:59:48+5:302016-03-03T01:59:48+5:30
एका जमिनीच्या प्रकरणात आपल्या बाजूने निकाल देण्यासाठी वसईच्या तहसिलदारांच्या नावाने दहा लाख रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी वसईतील एका तलाठ्याविरोधात ठाण्याच्या अंँटीकरप्शनच्या पथकाने

तहसीलदारांच्या नावाने दहा लाखांची लाच
वसई : एका जमिनीच्या प्रकरणात आपल्या बाजूने निकाल देण्यासाठी वसईच्या तहसिलदारांच्या नावाने दहा लाख रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी वसईतील एका तलाठ्याविरोधात ठाण्याच्या अंँटीकरप्शनच्या पथकाने वालीव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. चौकशी केल्यानंतर तलाठ्याच्या अटकेची कारवाई केली जाणार आहे.
सचिन बाजीराव जाधव असे तलाठ्याचे नाव आहे. तक्रारदार यांना जमिनीच्या सातबारा उताऱ्यावर कुटुंबांची नावे टाकायची होती. याप्रकरणी वसईच्या तहसिल यांच्या कोर्टात प्रकरण होते. याप्रकरणी निकाल त्यांच्या बाजूने लावून देण्यासाठी जाधव यांनी तक्रारदारांकडे दहा लाख रुपये मागितले. होते. ही रक्कम तहसिलदारांच्या नावाने मागण्यात आल्याने तक्रारदाराने ठाणे येथील अँटीकरप्शनकडे तक्रार केली होती. हे प्रकरण चार महिन्यांपूर्वीचे असून मी नुकताच वसईचा कार्यभार स्वीकारलेला आहे. याप्रकरणाशी माझा काहीच संबंध नाही. पोलिसांकडून अधिकृत काही कळवण्यात आलेले नाही, असे विद्यमान तहसिलदार गजेंद्र पाटोळे यांनी सांगितले. (प्रतिनिधी)