टेन ग्रुप ग्रामपंचायत प्रथमच बिनविरोध

By Admin | Updated: April 8, 2016 01:16 IST2016-04-08T01:16:35+5:302016-04-08T01:16:35+5:30

पालघर तालुक्यातील अटीतटीची निवडणूक होणार म्हणून गाजत असलेल्या ग्रुप ग्रामपंचायत टेण, टाकव्हाल, सावरखंड मध्ये निवडणुका न घेता पाच प्रभागामध्ये नेमलेल्या समित्या

Ten Group Gram Panchayat for the first time uncontested | टेन ग्रुप ग्रामपंचायत प्रथमच बिनविरोध

टेन ग्रुप ग्रामपंचायत प्रथमच बिनविरोध

आरीफ पटेल,  मनोर
पालघर तालुक्यातील अटीतटीची निवडणूक होणार म्हणून गाजत असलेल्या ग्रुप ग्रामपंचायत टेण, टाकव्हाल, सावरखंड मध्ये निवडणुका न घेता पाच प्रभागामध्ये नेमलेल्या समित्या व ग्रामस्थांनी १३ उमेदवार बिनविरोध प्रथमच निवडून देऊन नवा इतिहास व आदर्श घडविला आहे. पूर्ण पालघर जिल्ह्यासाठी हा वेगळा पॅटर्न ठरला आहे.
निवडणुका म्हणजे खर्चिक बाब आपआपसात रुसवा फुगवा भांडणे होणार हे लक्षात घेऊन गावाचा विकास करण्यासाठी सर्वांनी एकत्र येणे आज काळाची गरज आहे. या उद्देशाने टेण मोरेपाडा लहांगे पाडा, सुतारपाडा, गणेसकरपाडा, टाक व्हाल, रेंजपाडा, सावरखंड, धांगड पाड्यातील सर्व ग्रामस्थ एकता पॅनल च्या झेंड्याखाली एकत्र आल्यानंतर अ, ब, क, ड, ई प्रभागाप्रमाणे उमेदवार निश्चितीसाठी समित्या नेमल्या. त्या त्या प्रभागातील ग्रामस्थांना बरोबर घेऊन या समित्यांनी उमेदवार ठरविले प्रत्येक विभागातून १३ वॉर्डांसाठी १३ उमेदवारांची निवड करण्यात आली. फक्त याच उमेदवारांचे अर्ज निवडणूक अधिकाऱ्यांकडे सादर करण्यात आलेत.
ग्रामस्थ व नेमलेल्या समिती सदस्यांनी एकमताने टेन ग्रुप ग्रामपंचायतीची निवड बिनविरोध झाल्याचे घोषीत करण्यात आले. टेण ग्रुप ग्रामपंचायत बिनविरोध होणे म्हणजे लोखंडाचे चणे चावण्याचा प्रकार होता. मात्र हजी मुस्तफा राऊत, जहीर लोनबाल खलिल अबारी, महमद सेख, फिरोज पटेल, तुकाराम मोरे, चंद्र गोवारी, शिवराम गोवारी, आदी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पांडुरंग गोवारी, सदस्य पंचायत समिती पालघर, जबी राऊत, सालिम बुवेरे, किरण गोवारी, भगवान मोहिते, जककी लोनबाल, भरत तारवी, बाबल्या पाडेकर, मुख्तार शेख, संजय साळुंखे, किशोर मोरे, आलताफ अवारी, सदानंद गणेसकर, धर्मेस दळवी, वसिम अवारी, अजीज पटेल, विनोद दळवी, आशफाक शेख, सर्फराज दळवी असे तरूण पुढे आले व त्यांनी सर्व ग्रामस्थांना जवळ केले. मग तो रिक्षावाला असो, भाजी विकणारा असो किंवा मजूर असो. हम करे सो कायदा असे न करता सर्वांच्या मताने सर्वांना हा चमत्कार घडवून आणला गेला.

Web Title: Ten Group Gram Panchayat for the first time uncontested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.