शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
3
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
4
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
5
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
6
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
7
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
8
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
9
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
10
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
11
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
12
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
13
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
14
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
15
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
16
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
17
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
18
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?
19
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
20
पंजाब किंग्सची जोरदार फटकेबाजी, सनरायझर्स हैदराबादसमोर दोनशेपार लक्ष्य

वाढीव बांधकामांवर कर लागू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 30, 2018 12:15 AM

वसई, विरार महापालिकेचा निर्णय : तिजोरीत ५० कोटींची पडणार भर, महिनाभरात प्रक्रिया पूर्ण

वसई : २००९ मध्ये महानगरपालिकेची स्थापन झाली, तेव्हा तिच्यात चार नगर परिषदा आणि ५२ ग्रामपंचायत हद्दीमधील गावांचा समावेश झाला होता. त्यानंतर मालमत्तांचे नव्याने सर्वेक्षण झाले नव्हते. मात्र आता वाढवलेल्या बांधकामावर महानगरपालिकेने करआकारणी करण्यास सुरुवात केली आहे. यामुळे तिच्या तिजोरीत ५० कोटींची भर पडणार आहे.

तिचे पहिले लक्ष्य पेल्हार आणि वालीव प्रभाग समितीमधील औद्योगिक आणि व्यावसायिक बांधकामे आहेत. या ठिकाणी हजारोंच्या संख्येने अधिकृत आणि अनधिकृत बांधकामे झालेली आहेत. त्यांनी मनमानी अतिक्रमण करून क्षेत्रफळ वाढवून घेतलेले आहे. त्यांच्याकडून नवीन करआकारणी करण्यास सुरुवात केली असल्याचे स्थायी समिती सभापती सुदेश चौधरी यांनी सांगितले.एका महिन्यात हे काम पूर्ण केले जाणार आहे. वसई-विरार शहरात ६ लाख ४९ हजार मालमत्ता आहेत. मात्र त्यांचे योग्य करनिर्धारण झाले नसल्याने कोट्यावधी रुपयांच्या उत्पन्नावर पाणी सोडावे लागत आहे. शहरातील ३० टक्के मालमत्तावर चुकीची करआकारणी होत असल्याचे समोर आले होते. तर अनेक मालमत्तांवर कर आकारणी करण्यात आलेली नाही. महापालिकेला २०१८-१९ या आर्थिक वर्षांत मालमत्ता करापोटी २३० कोटींचे उत्पन्न अपेक्षित आहे.

विशेष म्हणजे व्यावसायिक आणि औद्योगिक मालमत्तांवर घरगुती दरानेच कर आकारणी केली जात आहे. त्यामुळे ते उत्पन्न पालिकेला मिळत नव्हते. सध्याच्या साडेसहा लाख मालमत्तांधील ३० टक्के मालमत्तांवर चुकीची कर आकारणी होत होती. तसेच ज्यांच्या मालमत्ता हजार चौरस फुटांच्या आहेत, त्यांना केवळ ५०० चौरस फुटाप्रमाणेच कर आकारणी होत असल्याचे आढळून येत होते. वालीव आणि पेल्हार प्रभागात अनेक औद्योगिक कंपन्यांनी आपल्या मालमत्तांचे क्षेत्रफळ वाढवले आहे. त्यांचा ते व्यावसायिक वापर करीत आहेत. मात्र महापालिकेला त्यावर जुन्या क्षेत्रफळाप्रमाणे कर आकारत आहे.

महापालिकेच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत नव्या करआकारणीचा आराखडा तयार करण्यात आला असून वाढीव मालमत्ताधारकांकडून वाढीव करआकारणी केली जाणार आहे. एका महिन्याच्या कालावधीत ही प्रक्रीया पूर्ण केली जाणार आहे....तर सहायक आयुक्तांवर कारवाईकर आकारणीचे काम सर्व ९ प्रभाग समतिीमधील साहाय्यक आयुक्तांकडे देण्यात आलेले आहे. नवीन पद्धतीने मालमत्तांवर कर आकारणी करण्यात आलेली आहे की नाही, त्याची पाहणी केली जाणार आहे. त्यात जर मेहेरबानी करून कोणाला वगळले असल्यास संबंधित साहाय्यक आयुक्तांवर बडगा उगारला जाणार आहे. यात ग्रामपंचायत काळातील गावांमधील अनेक घरांचे आता इमले झालेले आहेत. मात्र त्यांच्याकडून ग्रामपंचायत काळापासूनचा कर आकारला जात आहे. अशा नागरिकांनी स्वत:हून पुढे येऊन आपले वाढीव क्षेत्रफळ जाहीर करावे असे आवाहन महानगरपालिकेकडून करण्यात आले आहे.

टॅग्स :Vasai Virarवसई विरार