शहरं
Join us  
Trending Stories
1
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
2
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
3
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
4
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
5
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
6
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
7
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
8
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
9
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
10
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
11
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
12
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
13
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
14
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
15
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
16
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
17
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
18
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
19
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
20
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका

प्रदूषणामध्ये तारापूर देशात प्रथम क्रमांकावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2019 11:13 PM

राष्ट्रीय हरित लवादाने शंभर उद्योगाची प्रसिद्ध केली यादी, तारापूरचा प्रदूषणाचा निर्देशांक ९३.६९

पंकज राऊत बोईसर : देशातील पहिल्या १०० प्रदूषणकारी औद्योगिक क्षेत्राची यादी नवी दिल्लीच्या राष्ट्रीय हरित लवादाच्या (एनजीटी) प्रिन्सिपल बेंच समोर झालेल्या सुनावणीमध्ये प्रसिद्ध करण्यात आली असून त्यामध्ये तारापूर एमआयडीसी प्रदूषणामध्ये पहिल्या क्र मांकावर आले असून आता तरी केंद्रीय व महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने तारापूरचे प्रदूषण नियंत्रणात आणण्यासाठी खंबीर भूमिका घेणे गरजेचे आहे.एका इंग्रजी वृत्तपत्रात सीपीसीबी टू रँक इंडस्ट्रीयल युनिटस् आॅन पोल्युशन लेव्हल्स यासंदर्भात आलेले वृत्त तसेच मूळ अर्ज नंबर १०३०/२०१८ नुसार दाखल केलेल्या याचिकेची सुनावणी १० जुलै २०१९ रोजी न्यायमूर्ती आदर्श कुमार गोयल (चेअरपर्सन), न्या.एस.पी.वांगडी, (ज्युडीशिअल मेंबर), न्या.के.रामकृष्णन (ज्युडिशिअल मेंबर ) व डॉ नगीन नंदा (एक्सपर्ट मेंबर) यांच्या खंडपिठासमोर झाली.

या याचिकेची सुनावणी करताना केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने देशातील औद्योगिक क्षेत्रांना त्यांच्या प्रदूषण करण्याच्या पातळीवर क्रमांकवारी ठरवून (कॉम्प्रेहेन्सिव्ह एन्व्हायरमेंट पोल्युशन इंडेक्स) सर्वसमावेशक पर्यावरण प्रदूषण निर्देशांकच्या आधारित देशातील शंभर औद्योगिक क्षेत्राची यादी ठरविण्यात आली आहे.

तारापूरमधील प्रदूषणाचा निर्देशांक ९३.६९ इतका सर्वाधिक नोंदवण्यात आला आहे. या खालोखाल नाजफग्रह- ड्रेन बिसन यांच्यासह आनंद प्रभात, नाराऐना, ओखला, वाझिरपूर (दिल्ली) (निर्देशांक ९२.६५) उत्तर प्रदेशमधील मथुरा (निर्देशांक ९१.१०) व कानपूर ( निर्देशांक ८९.४६) तर गुजरातमधील वडोदरा शहराचा (निर्देशांक ८९.०९) असे देशातील पहिले पाच प्रदूषणकारी औद्योगिक क्षेत्र असल्याचे समोर आले आहे.

औद्योगिक क्रियाशिलतेचे मोजमाप, पर्यावरण विषयक मापदंड, कायदयाचे होणारे उल्लंघन, स्थानिकांची आरोग्यविषयक माहिती तसेच पर्यावरण नियमांची माहिती व कायद्याच्या पूर्तता या बाबी विचारात घेण्यात आल्या. या शंभर औद्योगिक क्षेत्रांपैकी ३८ क्षेत्र हे क्रिटिकल पोल्युटेड एरिया या अंतर्गत येत असून इतर ३० औद्योगिक क्षेत्र हे सिव्हीअर पोल्युटेड एरिया आहे.

राज्यातील चंद्रपूर क्षेत्र २७ व्या क्र मांकावर (निर्देशांक ७६.४१) आहे तर ३९ व्या क्रमांकावर औरंगाबाद (निर्देशांक ६९.८५), ४० व्या क्र मांकावर डोंबिवली (निर्देशांक ६९.६७), ४१ व्या क्र मांकावर नाशिक (निर्देशांक ६९.४९), ५१ व्या क्र मांकावर नवी मुंबई (निर्देशांक ६६.३२), ८० व्या क्र मांकावर चेंबूर औद्योगिक क्षेत्र (निर्देशांक ५४.६७), ८६ व्या क्र मांकावर पिंपरी-चिंचवड (निर्देशांक ५२.१६) तर ९२ व्या क्रमांकावर महाड (निर्देशांक ४७.१२) असल्याचे राष्ट्रीय हरित लवादाने प्रसिद्ध केलेल्या यादीवरून दिसून येते आहे.