टॅँकरला पाणीही नाही आणि डिझेलही नाही !
By Admin | Updated: April 14, 2016 00:46 IST2016-04-14T00:46:50+5:302016-04-14T00:46:50+5:30
वाडा तालुक्यातील टंचाईग्रस्त भागाला पाणीपुरवठा करणाऱ्या टँकर्सला भरण्यासाठी पाणी पुरवठा विभाग पाणीच उपलब्ध करून देत नाही. शिवाय इंधन व्यवस्था होत नाही. प्रशासनाच्या ढिसाळ

टॅँकरला पाणीही नाही आणि डिझेलही नाही !
वाडा : वाडा तालुक्यातील टंचाईग्रस्त भागाला पाणीपुरवठा करणाऱ्या टँकर्सला भरण्यासाठी पाणी पुरवठा विभाग पाणीच उपलब्ध करून देत नाही. शिवाय इंधन व्यवस्था होत नाही. प्रशासनाच्या ढिसाळ कारभाराला कंटाळून आज अखेर
टँकर मालकांनी टंचाईग्रस्त गावांना पाणीपुरवठा न करता रिकामे टँकर पंचायत समितीच्या आवारात
उभे करून प्रशासनाचा निषेध केला आहे.
तालुक्यातील ओगदा, सागमाळ, टोकरेपाडा, जांभूळपाडा, १० मार्च पासून या गावांना टँकरने पाणीपुरवठा सुरू असल्याचे अधिकारी सांगतात. माात्र या गावातील महिलांची पाण्यासाठी वणवण सुरूच आहे. टँकरच्या अडचणीमुळे प्रत्यक्षात नागरीकांना पाणी मिळत नाही. तर उज्जनी, सातरोंडे, साखरशेत, आंबेवाडी येथे उद्यापासून टँकरने पाणीपुरवठा सुरू करणार असल्याचे
पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. मात्र प्रत्यक्षात ज्या गावांना टँकरने पाणीपुरविण्याचे शासनाचे आदेश असतानाही तेथेही पाणी पोहचत नाही तर प्रतिक्षेत असणाऱ्या गावांना पाणी कधी मिळणार हा प्रश्न येथील नागरीकांना पडला आहे.(वार्ताहर)