शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थ पवार ते ७० हजार कोटी; दोन मोठ्या आरोपांवर अजितदादांचे उत्तर; म्हणाले, "सकाळी कामाला लागतो ते..."
2
"कुराणची शपथ घेऊन सांगतो, भाजप...!" मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांचा मोठा दावा, राजकारण तापलं
3
“टॅरिफला विरोध करणारे मूर्ख, आम्ही अमेरिकेला श्रीमंत केले, इथे महागाई नाही”: डोनाल्ड ट्रम्प
4
पार्थच्या व्यवहाराचे ४२ कोटी कोण भरणार? मुंढव्यातील वादग्रस्त व्यवहार आज रद्द होणार?
5
जडेजा-सॅमसनच्या 'डील'मध्ये डेवाल्ड ब्रेव्हिसचा अडथळा, आयपीएलमध्ये चेन्नई, राजस्थान यांच्यात खेळाडूंची अदलाबदली होण्याची शक्यता
6
Kalbhairav Jayanti 2025: बुधवार १२ नोव्हेंबर कालभैरव जयंती; शिवाचे हे उग्ररूप कशासाठी?
7
बिहारमध्ये योगी आदित्यनाथ यांचा झंझावात, १० दिवसांत ३१ रॅली; काँग्रेस आणि RJD वर घणाघात
8
'नीट'च्या दोन मार्कलिस्ट अन् विद्यार्थिनीला धक्का, पालकही चिंताग्रस्त; कुटुंब निराशेच्या गर्तेत
9
विद्यापीठात पॉलिमर केमिस्ट्री प्रयोगशाळा; संशोधकांना मिळेल प्रेरणा, विकासात योगदान
10
आजचा अग्रलेख: भारतीयांची क्षमता जोखा, साखर नको!
11
परराज्यातील मुलांना एमबीबीएसला प्रवेश घेण्याची मुभा द्या, पालघरच्या कॉलेजने घेतली उच्च न्यायालयात धाव
12
कपड्यांवरुन होणाऱ्या ट्रोलिंगवर पहिल्यांदाच बोलल्या अमृता फडणवीस, म्हणाल्या- "मला वाईट वाटतं, पण..."
13
आजचे राशीभविष्य,१० नोव्हेंबर २०२५: दुपार नंतर समस्या कमी होऊ लागतील; सामाजिक प्रतिष्ठेत वाढ होईल
14
तीन शहरांत रेकी, विषही तयार; अतिरेक्यांचा मोठा कट उधळला, गुजरात एटीएसने पकडले ३ अतिरेकी
15
एक दिवस CM बनवलं तर काय कराल? अमृता फडणवीस म्हणाल्या- "मी देवेंद्रजींना..."
16
१२ वर्षांनी शतांक गजकेसरी योग: ८ राशींना लॉटरी, इच्छापूर्ती; नवीन नोकरी, अकल्पनीय पैसा-लाभ!
17
विशेष लेख: 'हमारी छोरिया छोरो से कम हैं के?'
18
महाराष्ट्र्रात १३ हजार बोगस कंपन्यांना टाळे; जीएसटीविरोधीत मोहीम
19
मराठी अभिनेता दुसऱ्यांदा होणार बाबा, पार पडलं पत्नीचं बेबी शॉवर; अरुण गवळीच्या मुलीसोबत थाटलाय संसार
20
मुस्लिम आणि ख्रिश्चन RSS चे सदस्य होऊ शकतात का? मोहन भागवत म्हणाले, "शाखेत येऊ शकतात, पण..."

टँंकर ठेकेदाराच्या हलगर्जीचा टंचाईग्रस्त गावांना फटका

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 31, 2019 23:12 IST

प्रस्ताव देऊनही : अंमलबजावणी नाही,प्रशासनाचीही डोळेझाक ?

वाडा : जव्हार, मोखाडा तालुक्याप्रमाणेच वाडा तालुक्यातील पन्नासहून अधिक गाव, पाडे भीषण पाणी टंचाईने होरपळून निघाले आहेत. सध्या अवघ्या चार टँकरने पाणी पुरवठा सुरु आहे. ही संख्या अपुरी पडत असल्याने ती वाढविण्याचा प्रस्ताव ठेकेदाराला पंधरा दिवसांपूर्वी देऊनही त्याने केलेल्या हलगर्जीपणामुळे येथील २० ते २२ गाव-पाड्यातील नागरिकांवर पाण्यासाठी वणवण भटकण्याची वेळ आली आहे.

वाडा तालुक्यातील भीषण पाणी टंचाई लक्षात घेऊन येथील गटविकास अधिकारी राजलक्ष्मी येरपुडे यांनी या तालुक्यातील ३५ गाव-पाड्यांवर चार टँकरने पाणी पुरवठा सुरु केला आहे. मात्र हे चार टँकरही अपुरे पडत असून अनेक पाड्यांवर तीन ते चार दिवसांनी टँकर जात आहे.वाडा तालुक्यातील नव्याने पाणी टंचाईग्रस्त असलेली चेंदवली, तोरणे, धावरपाडा, ओगदा ग्रामपंचायत अंतर्गत मुहुमाळ, ताडमाळ, करांजे गाव अंतर्गत येणारे खडकपाडा, धिंडेपाडा, पाटीलपाडा तसेच सापणे गावचे चार पाडे, फणसगांव (ओगदा) अशा अनेक पाड्यांवरील नागरिक गेल्या महिनाभरापासून भीषण पाणी टंचाईला तोंड देत आहेत. या गांव-पाड्यांना टँकरने पाणी पुरवठा सुरु करण्यासाठी जिल्हाधिकारी पालघर यांनी मंजुरी दिली आहे.वाडा पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांनी तत्काळ (१६ मे) पालघर जिल्ह्याला टँकरने पाणी पुरवठा करणारे टँकर ठेकेदार यांना पत्र देऊन येथील टंचाई ग्रस्त गांव-पाड्यांवर दोन टँकरने पाणी पुरवठा करण्याचे आदेश दिले आहेत.

मात्र गेले पंधरा दिवस होऊनही संबंधीत ठेकेदाराने टँकर सुरु न केल्यामुळे येथील पंधराहून अधिक टंचाईग्रस्त गांव-पाड्यातील नागरीकांना पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागत आहे. अनेक ठिकाणी तर दीड ते दोन किलोमीटर अंतरावरु न पाणी येथील महिलांना आणावे लागत आहे.

पाण्याअभावी हागणदारी सुरु

वाडा तालुक्यातील आदिवासी व दुर्गम भागातील हगणदारी मुक्ततेसाठी शासनाने शंभर टक्के अनुदानाने हजारो लाभार्थ्यांना शौचालये बांधून दिली आहेत. मात्र पाणी टंचाईमुळे ही शौचालये बंद पडली असून पाण्याअभावी अनेकजण आज उघड्यावरच शौचास जात आहेत.दरम्यान देवळी, आपटी, गोऱ्हे तसेच वाडा शहरातील काही नगरांमधील काही नागरिक बैलगाडी, लहान टँकरने येणारे पाणी रोज ५० ते १०० रुपयांचे एक बॅरल (२०० लीटरची टाकी) याप्रमाणे विकत घेत आहेत. पाण्यासाठी हजारो रु पये मोजावे लागत असल्याने येथील नागरिक शासन व प्रशासनावर संताप व्यक्त करीत आहेत.

टॅग्स :water scarcityपाणी टंचाईpalgharपालघर