शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्तृत्वशून्य लोकांकडूनच जाती-धर्माच्या नावे राजकारण केले जाते: नितीन गडकरींचा टोला
2
अजित पवार गटाच्या आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाचा भिवंडीजवळ महामार्गवरील अपघातात मृत्यू
3
कोलकाता नाईट रायडर्स अव्वल स्थानी! LSG ला नमवून प्ले ऑफची जागा जवळपास केली पक्की 
4
रक्तानं आपलं चित्र रेखाटणाऱ्या कलाकाराचं आधी फडणवीसांकडून कौतुक अन् नंतर दिला प्रेमळ सल्ला!
5
निवडणूक रोख्यांमुळे पंतप्रधान कार्यालय वसुलीचे कार्यालय बनल्याचे स्पष्ट- प्रकाश आंबेडकर
6
महायुतीचे उमेदवार उज्ज्वल निकम यांच्यासाठी मुलगा अनिकेत निकम यांचा घरोघरी जाऊन प्रचार
7
लोकसभा निवडणुकीतील तिसऱ्या टप्प्याचे मतदान जवळ येताच सोशल मीडियावर रायगड पोलिसांची करडी नजर
8
डॉक्टर प्रविण अग्रवाल विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल; रुग्ण महिलेसोबत अश्लील वर्तनाचा आरोप
9
अपघात की..? वांद्रे येथे नारळाचे झाड अचानक कोसळले! रिक्षाचालक जखमी, दुकानही जमीनदोस्त
10
मागील दोन महिन्यात झपाट्याने वाढलेल्या सोने-चांदीच्या किंमती घसरल्या, जाणून घ्या भाव
11
ठाण्यात अजब घटना! धक्का लागल्याचा जाब विचारल्याने मद्यपीचा वृद्धावर चाकूने हल्ला
12
धक्कादायक घटना! दहा लाखांमध्ये घराचे आमिष दाखवून एक कोटी ४८ लाखांची फसवणूक
13
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
14
दारूची वाहतूक अन् वाटपावर 'एक्साईज'ची करडी नजर; रात्रंदिवस सोलापुरात पथके राहणार तैनात
15
ठाणे जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी गांभीर्यपूर्वक काम करण्याचे अधिकाऱ्यांना धडे
16
कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार ३८ वर्षीय बाळासाहेब नंदुर्गे यांचा पिंपरीत हृदविकाराने मृत्यू
17
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
18
सोलापुरात भाजपा, काँग्रेस, बसपाच्या  प्रचाराबद्दल आचारसंहिता भंगचे गुन्हे 
19
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
20
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा

तलासरी - डहाणूत भूकंपाचे जोरदार धक्के

By ऑनलाइन लोकमत | Published: July 26, 2019 2:31 AM

घर कोसळून एकाचा मृत्यू : उपाययोजनांकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

तलासरी/डहाणू : पालघर जिल्ह्यातील तलासरी, डहाणू भागात गुरुवारी पहाटे एक वाजण्याच्या सुमारास भूकंपाचे तीन जोरदार धक्के बसले. ३.८ रिश्टरच्या या भूकंपाने डहाणू तालुक्यातील एकाचा बळी घेतला. रिश्या मेघवाले असे त्यांचे नाव आहे. पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी या भागाला भेट दिली असून मृताच्या नातेवाइकांना ४ लाखांची मदत जाहीर केली आहे.

नागझरी - वसावलापाडा येथील रिश्या हे शेतावरील घरात झोपले होते. भूकंपाच्या धक्क्याने घर त्यांच्या अंगावर कोसळून त्यांचा जागीच मृत्यू झाला. तलासरी, डहाणू परिसरात गुरुवारी रात्रभर छोटे धक्के बसत होत. त्यात १ वाजून ३ मिनिटांनी ३.८ रिश्टरचे लागोपाठ बसलेले धक्के जोरदार होते. या धक्क्यांनी सवणे गावातील अनेक घरांना तडे गेले आहेत.

भूकंपाने तालुक्यातील ७५ शाळा, ५२ अंगणवाड्यांना तडे गेले आहेत. या शाळा - अंगणवाड्यांना तंबू टाकण्यासाठी महसूल विभागाने ताडपत्र्या पुरविल्या. पण त्या ताडपत्र्यांचे तंबू अजून तयार झालेले नाहीत. अंगणवाड्यांना तंबू बनवून देण्याबाबत ग्रामपंचायतींना विनंत्या करण्यात आल्या. याबाबतची दोन पत्रेही तलासरी गट विकास अधिकाऱ्यांना दिली. पण त्यांनी दखल घेतली नाही. तहसील कार्यालयाने ताडपत्र्या पुरवल्या तरीही त्यांचे तंबू बनवले का? याची पाहणी केली नाही. याबाबत तलासरीच्या तहसीलदार स्वाती घोंगडे म्हणाल्या, याबाबतची माहिती गुरुवारी ग्रामसेवकाकडून घेण्यात येईल. तलासरीचे बालविकास प्रकल्प अधिकारी आनंद जाधव यांनी सांगितले की, अंगणवाड्यांना तंबू बांधून देण्याबाबत दोन पत्रे पंचायत समितीच्या मिटिंगमध्ये देण्यात आली आहेत.

प्रशासनाने केली रिश्टर स्केलमध्ये दुरुस्तीभूकंप मापक यंत्राने रात्रीच्या भूकंपाची नोंद ४.८ पाठविली. त्यात प्रशासनाने तत्काळ दुरुस्ती करून ती ३.८ रिश्टर असल्याचे जाहीर केले. पालघर जिल्हाधिकारी कैलास शिंदे यांना धोकादायक शाळा, अंगणवाड्यांना तंबू बांधण्यासाठी पुरविण्यात आलेल्या ताडपत्र्यांबाबत विचारणा केली असता याची माहिती घेऊन संबंधितांवर कारवाई करण्यात येईल, असे सांगितले.

टॅग्स :Earthquakeभूकंप