शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
4
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
5
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
6
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
7
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
8
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
9
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
10
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
11
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
12
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
13
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
14
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
15
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
16
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
17
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
18
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
19
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
20
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू

कावळे आश्रमशाळा अधीक्षिकेला निलंबित करा, आदिवासी विकास परिषदेची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 14, 2019 00:35 IST

एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प जव्हार अंतर्गत कावळे शासकीय आश्रमशाळा, ता. विक्रमगड, जि. पालघर येथील बारावीत शिक्षण घेणाऱ्या काही विद्यार्थिनी अधिक्षिकेच्या अमानवी जाचाला कंटाळून प्रकल्प अधिकाऱ्यांना भेटण्यास गेल्या.

जव्हार : एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प जव्हार अंतर्गत कावळे शासकीय आश्रमशाळा, ता. विक्रमगड, जि. पालघर येथील बारावीत शिक्षण घेणाऱ्या काही विद्यार्थिनी अधिक्षिकेच्या अमानवी जाचाला कंटाळून प्रकल्प अधिकाऱ्यांना भेटण्यास गेल्या. मात्र, बकरी ईदची सुट्टी असल्याने त्यांना माघारी फिरावे लागले. यावेळेस अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद, पालघर जिल्ह्याचे जव्हार तालुका उपाध्यक्ष महेश घेगड यांनी त्यांची समस्या जाणून घेतली. ही गंभीर बाब लक्षात घेऊन संघटनेने मंगळवारी सकाळी कार्यालयात ठिय्या मांडून अधीक्षक बाईला निलंबित करा अशी मागणी केली आहे.या आश्रमशाळेत सध्या अधीक्षिका बार्इंची मनमानी सुरू असल्याचे मुलींचे म्हणणे आहे. कपडे सुकण्यासाठी मुलींना दोरी बांधू न देणे, एकच कपडा सहा/सात दिवस वापरणे, सुटीच्या दिवशी देखील शाळेचा गणवेश घालावयास लावणे, कपडे सुकत टाकल्यास त्यांच्याकडून दंड घेणे तसेच त्यांना ५० ते १०० दंड बैठक काढायला सांगणे. शिक्षा म्हणून शौचालय साफ करणे, शाळा साफ करणे अशी शिक्षा केली जात असल्याचे या विद्यार्थिनींनी सांगितले. तसेच शिक्षा म्हणून त्यांचे कपडे धुणे, भांडी घासणे अशी शिक्षा देखील देत असल्याचे त्या मुली सांगतात. पाणी नसल्यास इमारतीच्या खाली जाऊ न देणे, विना आंघोळ ठेवणे अशी अमानवी वागणूक या मुलींना मिळते.मुलींना एकमेकांच्या रूमकडे जाऊ न देणे, तसेच घरी जाण्यासाठी सुटी मागितल्यावर पहिल्यांदा वर्ग शिक्षकांची सही आणायला लावून मगच सुटी दिली जाते, असे या मुलींचे म्हणणे आहे. मात्र, शनिवारी शाळा सुटली की वर्गशिक्षक लगेच घरी जातात, मग सही आणू न शकल्याने आाम्हाला सुटी मिळत नाही. आमच्या शाळेत दोन गट केले आहेत. आम्हाला वेगळा न्याय दिला जातो आणि ज्या मुली अधीक्षिका बार्इंचे सगळे काम करतात त्यांना शिक्षा न करणे अशी वागणूक देतात. त्यामुळे आम्ही जाचाला कंटाळून प्रकल्प अधिकाºयांची भेट घेण्यासाठी आलो. आणि संघटनेच्या वतीने ठिय्या आंदोलन करण्यात आले. जोपर्यंत अधीक्षिका मॅडमची बदली होत नाही तोवर एकही मुलगी शाळेत जाणार नाही असेही या मुलींनी सांगितले.त्या मुली, चप्पल पायात न घालता आणि छत्री न घेता ऐन पावसाच्या दिवशी जव्हारला आल्या होत्या. एवढ्या वेदना दिल्या जातात की आज त्यांना हे पाऊल उचलावे लागत आहे. आम्ही त्यांच्या जिद्दीला दाद देतो. आमच्या आदिवासी मुलींनी किती अन्याय सहन करायचा, त्या अधीक्षिकेला जव्हार प्रकल्पातून हाकलून देऊन त्यांची बदली दुसरीकडे करावी यासाठी प्रकल्प अधिकारी यांना भेटणार आहोत.- दशरथ महाले, सचिव वाडाआदिवासी बहिणींना अशी अमानवी वागणूक देणाºया त्या अधिक्षिका यांची बदली करण्यात यावी यासाठी प्रकल्प अधिकारी यांना भेटणार आहोत.- लहू नडगे,तालुकाध्यक्षविक्र मगड

टॅग्स :Vasai Virarवसई विरार