वाडा येथील बलात्कारितेची संशयास्पद आत्महत्या

By Admin | Updated: July 7, 2017 06:02 IST2017-07-07T06:02:12+5:302017-07-07T06:02:12+5:30

लैंगिक अत्याचारातून गर्भवती झालेल्या पिंपरोळी येथील युवतीने मंगळवारी साई देवळी गावाच्या मागील बाजूस असलेल्या तलावात

Suspected suicide of rape in Wada | वाडा येथील बलात्कारितेची संशयास्पद आत्महत्या

वाडा येथील बलात्कारितेची संशयास्पद आत्महत्या

लोकमत न्यूज नेटवर्क
वाडा: लैंगिक अत्याचारातून गर्भवती झालेल्या पिंपरोळी येथील युवतीने मंगळवारी साई देवळी गावाच्या मागील बाजूस असलेल्या तलावात उडी मारून आत्महत्या केली आहे. वाडा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
दिलीप मढवी या इसमाने मयत युवतीला पळवून नेऊन डहाणू तालुक्यातील कासा पोलीस ठाण्याच्या हद्दीत तिच्यावर सलग ३ दिवस लैंगिक अत्याचार केले. याबाबत कोणालाही सांगितले तर तिच्यासह संपूर्ण कुटुंबाला जीवे ठार मारण्याची धमकी तिला दिली होती. त्यातच तिच्या पालकांची तक्रार घेण्यात पोलीसांनी हद्दीचा वाद पुढे करुन चाल ढकल केली होती. पुढे कासा पोलीसांनी आरोपीला अटक केली. दरम्यान, तरुणीला मामाच्या घरी पाठवण्यात आले होते.
सोमवारी सायंकाळी ती बेपत्ता झाल्यानंतर तशी तक्रार दाखल करण्यात आली होती. मंगळवारी साई देवळी गावाच्या मागील बाजूस असलेल्या तलावात तिचा मृतदेह आढळून आला. याबाबत अधिक तपास सुरु आहे.

Web Title: Suspected suicide of rape in Wada