आरोपीचा संशयास्पद मृत्यू

By Admin | Updated: July 8, 2017 03:54 IST2017-07-08T03:54:14+5:302017-07-08T03:54:14+5:30

नालासोपारा पोलीस ठाण्यात पोलीस कोठडीत असलेल्या आरोपीचा संशयास्पद मृत्यू झाला. महेश मुलमुले असे त्याचे नाव असून, तो

Suspected death of the accused | आरोपीचा संशयास्पद मृत्यू

आरोपीचा संशयास्पद मृत्यू

लोकमत न्यूज नेटवर्क
वसई : नालासोपारा पोलीस ठाण्यात पोलीस कोठडीत असलेल्या आरोपीचा संशयास्पद मृत्यू झाला. महेश मुलमुले असे त्याचे नाव असून, तो विलेपार्लेचा (मुंबई) राहणारा आहे.
आरोपीवर अर्नाळा सागरी पोलीस ठाण्यात आयपीसी ४२०, ४०६ अन्वये गुन्हा दाखल होता. त्याला वसई न्यायालयाने पोलीस कोठडी दिली होती. पण त्याला नालासोपारा पोलीस ठाण्याच्या कोठडीत ठेवले होते. गुरु वारी रात्री ११.०५ वाजता कोठडीमध्ये उलट्या सुरू झाल्याने त्याला वसई विरार पालिकेच्या नालासोपारा येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. शुक्रवारी सकाळी साडेसात वाजल्यापासून त्याच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते. पण संध्याकाळी उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला आहे. आरोपीने कस्टडीत विषारी औषध प्यायल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. शवविच्छेदन झाल्यानंतरच खरे कारण कळेल. या प्रकरणी पोलिसांनी अधिकृत प्रतिक्रि या देण्यास नकार दिला.

Web Title: Suspected death of the accused