शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरेंनी दोनदा फसवण्याचा प्रयत्न केला; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा दावा
2
तुम्ही बिनशर्त पाठिंबा सगळं गुजरातला देण्यासाठी दिलाय का? आदित्य ठाकरेंचा मनसैनिकांना खोचक टोला
3
अरविंद केजरीवाल पहिल्यांदाच करणार काँग्रेसचा प्रचार; आज दिल्लीत घेणार जाहीर सभा
4
बीसीसीआय सेहवाग, गंभीरला डावलणार? मुख्य प्रशिक्षक पदासाठी व्हीव्हीएस लक्ष्मण देखील इच्छुक
5
Baba Ramdev Patanjali Foods : बाबा रामदेव यांच्या कंपनीला मोठा झटका, मार्च तिमाहीत २२ टक्क्यांनी घसरला नफा 
6
17000 राजकारणी, अब्जाधीशांनी देश बुडविला; पाकिस्तानींनी दुबईत घेतली तब्बल 23000 घरे
7
पंतप्रधान मोदी आज महाराष्ट्र दौऱ्यावर; दिंडोरी अन् कल्याणमध्ये सभा, मुंबईत होणार रोड शो
8
आजचे राशीभविष्य १५ मे २०२४; आजची सकाळ फलदायी, अनेक राशींची परिस्थिती दुपारनंतर बदलणार
9
पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे ना घर आहे, ना गाडी; कर भरला ३ लाखांवर, ३ कोटींची एकूण संपत्ती
10
उद्धव ठाकरे माझाही कार्यक्रम करणार होते; 'लोकमत'ला दिलेल्या मुलाखतीत CM शिंदेंचा हल्लाबोल
11
उद्धव ठाकरेंचा भाजपा आमदार फोडायचा, फडणवीसांना अटक करण्याचा होता डाव: CM शिंदे
12
धारावीतच घर, दुकान मिळणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आश्वासन
13
राहुल गांधींच्या प्रचारासाठी काँग्रेसचा नवा फंडा; भाषणांसोबत रील्स ठरल्या भारी
14
वसई-विरार पलीकडे मराठी माणूस का गेला? उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा सवाल
15
यंदाची निवडणूक देशाचे भवितव्य ठरवणारी; कांजूरमार्ग येथील सभेत शरद पवार यांचे मत
16
मजबूत अर्थव्यवस्थेसाठी स्थिर सरकार आवश्यक; केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचे मत
17
मध्यमवर्गीयांची पिळवणूक हेच काँग्रेसचे धोरण; पीयूष गोयल यांची टीका
18
पालिकेच्या मान्यताप्राप्त ऑडिटरचाच स्ट्रक्चरल स्टेबिलिटीचा रिपोर्ट! धक्कादायक माहिती समोर
19
रोड शो, रथयात्रांमुळे वाहतूककोंडी; वाहतुकीचे नियोजन करता करता मुंबईत पोलिसांच्या येते नाकीनऊ
20
धीरज वाधवानला सीबीआयकडून अटक; १७ बँकांकडून घेतलेल्या कर्जापैकी ३४ हजार कोटींचा अपहार

चिमुकल्या मैत्रिणीचा वाचवला जीव; जि.प. उपाध्यक्षांकडून सत्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2020 11:50 PM

राष्ट्रीय पातळीवर सन्मान करण्याची मागणी

विक्रमगड : विहीरीत पडलेल्या चिमुकल्या जागृतीचा जीव वाचवताना संजनाने दाखवलेल्या प्रसंगावधानाने केंद्रप्रमुख, शाळा मुख्याध्यापक, सर्व शिक्षक तसेच ग्रामस्थ या सर्वांनी तिचे कौतुक केले. शासनाने देखील तिच्या या धाडसी कामगिरीचे कौतुक करून तिला सन्मानित करावे अशी मागणी मंजुळा निचिते यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे. पालघर जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष निलेश सांबरे यांनी जागृतीचा जीव वाचवणाऱ्या संजना आणि तिच्या कुटुंबाची भेट घेऊन तिचा सत्कार केला. संजना तसेच जागृतीचा आर्थिक स्वरूपात बक्षीस देऊन गौरव केला.मंगळवार, १८ फेब्रुवारीला नेहमीप्रमाणे शाळा सुटल्यावर सायंकाळी विक्रमगड तालुक्यातील जि. प. प्राथमिक केंद्रशाळा कर्हेतलावली या शाळेत आठवीत शिकणारी संजना जेठू राव पाणी भरण्यासाठी विहीरीवर गेली. विहीरीच्या कठड्यावर हंडा ठेवून तिने विहिरीतून पाणी काढले. तेवढ्यात तिसरीमध्ये शिकणारी जागृती विष्णू राव ही देखील कळशी घेऊन पाणी भरु लागली. संजना डोक्यावर हंडा ठेवून जाणार तेवढ्यात जागृतीचा पाय घसरला आणि ती विहीरीत पडली.संजनाने लगेचच डोक्यावरील हंडा खाली ठेवला, आणि मदतीसाठी इकडे तिकडे बघू लागली. जवळपास कोणीच नसल्याने आपणच काहीतरी केल्याशिवाय पर्याय नाही, हे लक्षात आल्यावर तिने जोरात ओरडून जागृतीला हातपाय हलवण्यास सांगितले. जागृतीही पोहत राहण्याचा आटोकाट प्रयत्न करत होती. संजनाने स्वत: विहीरीत उतरायचे ठरवले. विहीरीला पायºया नव्हत्या, विहीर बांधत असताना चढण्या उतरण्यासाठी काही दगड सोडलेले होते, त्याचाच आधार घेऊन ती विहिरीत उतरली. तोवर जागृतीने कमालीचे धैर्य दाखवले. सतत दगडाकडे जाण्याचा प्रयत्न करत होती. अखेरीस संजना उभी असलेल्या दगडापर्यंत पोहोचण्यात ती यशस्वी झाली. आता पुढचं कठीण काम होतं ते जागृतीला घेऊन वर येणं. कारण दोन दगडांमध्ये अंतर खूप होतं. जागृतीला विहिरीबाहेर कसं आणलं, असं विचारलं तेव्हा ती म्हणाली की, जागृतीला खांद्यावर घेऊन तिला वर ढकलत मी एकेक दगड चढत वर आले. प्रसंगावधान दाखवत लगेच खांद्यावर घेऊन धावत जवळच असलेला सरकारी दवाखाना गाठला.दवाखान्यातील संपूर्ण स्टाफकडून कौतुकजागृती विहीरीत पडल्यापासून दवाखान्यात आणेपर्यंत सर्व परिस्थिती संजनाने एकटीने हाताळली. संयमाने व तेवढ्याच धाडसाने संजनाने दाखवलेले प्रसंगावधान कौतुकास्पद आहे. दुसºया दिवशी दवाखान्यातीलसंपूर्ण स्टाफने शाळेत येऊन तिला बक्षीस देऊन तिचे कौतुक केले. संजनाने दाखवलेल्या या धाडसा बद्दल केंद्रप्रमुख, शाळेचे मुख्याध्यापक, सर्व शिक्षक आणि ग्रामस्थांनी तिचे भरभरून कौतुक केले.