शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

सर्वेक्षण अधिकाऱ्यांना पिटाळले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2019 23:15 IST

स्थानिकांची एकजूट : बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी जमिनी न देण्याचा निर्धार

हितेन नाईक।लोकमत न्यूज नेटवर्कपालघर : सफाळेजवळील मांडे येथील अनेक शेतकरी शेतात आवणी करण्यासाठी गेल्याची संधी साधून त्यांच्या भागातील जमिनीची मोजणी करण्याचा प्रयत्न करणाºया बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या अधिकाऱ्यांना स्थानिकांनी एकजूट दाखवत पिटाळून लावले.

बुलेट ट्रेन या प्रकल्पाला कुठल्याही परिस्थितीत जमिनी मिळणार नाहीत असा निर्वाणीचा इशारा गुजरातच्या खेडूत समाज आणि आदिवासी एकता परिषदेच्या पदाधिकाºयांनी यापूर्वीच दिला आहे. तर बुलेट ट्रेनला अर्थसहाय्य करणाºया जपानमधील जिका कंपनीच्या पदाधिकाºयांनी नवसारी (गुजरात) तसेच जिल्ह्यातील काही भागात शेतकºयांची भेट घेतली असता त्यांनाही स्थानिक जनतेच्या विरोधाचा सामना करावा लागला होता.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महत्त्वाकांक्षी बुलेट ट्रेन प्रकल्पाला शेतकºयांचा दिवसेंदिवस वाढत चाललेला विरोध पाहता जपानचे अधिकारी डिसेंबर २०१८ रोजी भारतात दाखल झाले होते. जपान इंटरनॅशनल कॉ-आॅपरेशन एजन्सीकडून (जेआयसीए) या प्रकल्पासाठी अल्प दरात व्याज दराने कर्ज उपलब्ध करून दिले होते. मात्र गुजरातमधील खेडूत समाज, जिल्ह्यातील आदिवासी एकता परिषद, भूमिसेना आदी संघटनांनी या प्रकल्पाला जोरदार विरोध दर्शवीत सर्वेक्षण आणि भूसंपादनासाठी आलेल्या अधिकाºयांना पिटाळून लावण्याच्या घटना नेहमीच घडत आहेत. त्यामुळे शासन मोठा पोलीस बंदोबस्त ठेवून शेतकºयावर दबाव ठेवण्याचा प्रयत्न करीत असताना दुसरीकडे अनेक गैरव्यवहारात सापडलेल्या अधिकारी, कर्मचाºयांना बुलेट ट्रेनचे सर्वेक्षण व भूसंपादनाच्या कामासाठी नियुक्त करीत आमिषे दाखविण्याचा प्रयत्न होत असल्याचे शेतकºयांचे म्हणणे आहे.

१८ सप्टेंबर रोजी गुजरातमधील काही शेतकºयांनी थेट जपानच्या जेआयसीए कंपनीला पत्र लिहून भूसंपादन प्रक्रिया कंपनीच्या दिशानिर्देशानुसार होत नसल्याचे नमूद केले होते. हे भूसंपादन करताना केंद्र सरकार २०१३ सालच्या भूमिअधिग्रहण कायद्याचे उल्लंघन करीत असल्याचा आरोप शेतकºयांनी या पत्रात केला होता. या पार्श्वभूमीवर जपानच्या अधिकाºयांनी संबंधित शेतकºयांची भेट घेत याबाबत चर्चा करण्याची इच्छा व्यक्त केली होती. महाराष्ट्र आणि गुजरात राज्याच्या सीमेवर असलेल्या नवसारी जवळील अमदपूर गावात बैठकीचे आयोजन केले होते. यावेळी जिका कंपनीच्या शिष्टमंडळाचे प्रमुख कात्सुवो माटसुमोरो तर एकता परिषदेचे व भूमिसेनेचे काळूराम धोदडे सह शेकडो शेतकरी उपस्थित होते.शेतकºयांचा इशाराबुलेट ट्रेन प्रकल्पाला ग्रामस्थांचा तीव्र विरोध असताना व त्या विरोधात ग्रामसभेत एकमताने ठराव संमत करून शासनाला सादरही केला आहे. असे असतानाही बुलेट ट्रेन प्रकल्पाचे अधिकारी जबरदस्तीने जमिनीच्या सर्वेक्षणासाठी येऊन आमच्या जमिनी बेकायदेशीररित्या घेण्याचा प्रयत्न करीत असतील तर ते कदापी खपवून घेतले जाणार नाही, असा इशाराच शेतकºयांनी यावेळी देत अधिकाºयांना पिटाळून लावले. बुलेट ट्रेन प्रकल्पाला कुठल्याही परिस्थितीत जमिनी मिळणार नाहीत असा निर्वाणीचा इशारा आदिवासी एकता परिषदेच्या पदाधिकाºयांनी यापूर्वीच दिला आहे.