वैभव राऊतच्या पाठिंब्यासाठी रविवारी सभा; हिंदुत्ववादी संघटनांचा पुढाकार

By ऑनलाइन लोकमत | Published: January 31, 2019 11:16 PM2019-01-31T23:16:40+5:302019-02-01T06:53:17+5:30

मागील वेळी अशाच आंदोलनाचा उडाला होता फज्जा

Sunday rally to support Vaibhav Raut; The initiative of pro-Hindu organizations | वैभव राऊतच्या पाठिंब्यासाठी रविवारी सभा; हिंदुत्ववादी संघटनांचा पुढाकार

वैभव राऊतच्या पाठिंब्यासाठी रविवारी सभा; हिंदुत्ववादी संघटनांचा पुढाकार

Next

नालासोपारा : मुंबई एटीएस ने अटक केलेल्या वैभव राऊत याला पाठींबा दर्शविण्यासाठी पुन्हा एकदा मैदानात उतरून हिंदू गोवंश रक्षा समिती आणि हिंदत्वुनिष्ठ संघटनांकडून ३ फेब्रुवारीला पाटणकर पार्क येथील रायन इंटरनॅशनल शाळेच्या बाजूला असलेल्या मोकळ्या मैदानात संध्याकाळी ५.३० च्या दरम्यान हिंदू धर्मजागृती सभेचे आयोजन केले आहे.

याकरिता शहरातील मुख्य नाक्या नाक्यावर बॅनर लावण्यात आले असून त्यात वैभव राऊत याचाही फोटो टाकला असून त्याला पाठींबा दर्शवण्यासाठी सभा आहे का अशी चर्चा सर्वत्र सुरू झाली आहे. या सभेमध्ये वैभव राऊत याची केस हाताळणारे व जातीने लक्ष घालणारे सुप्रसिद्ध वकील संजीव पुनाळेकर येणार असल्याची माहिती समनवयक दिप्तेश पाटील यांनी दिली असून या सभेत ते काय बोलणार याकडे पोलिसांचे लक्ष असणार आहे. गोरक्षा करणाऱ्यांना खोट्या गुन्ह्यात कोण अडकवतो तसेच वैभव राऊतला खोट्या गुन्ह्यात मुंबई एटीएसने कसे अडकवले याबद्दलही ते बोलणार असल्याचे कळते. या सभेसाठी पोलिसांकडे नॉर्मल अर्ज केलेला असून कोणतीही रीतसर परवानगी मागितली नाही. नालासोपारा पोलिसांनी या सभेसाठी कोणतीही परवानगी दिलेली नाही. वैभव राऊत याची केस सांभाळणारे वकील संजीव पुनाळेकर येणार असल्यामुळे अनेक हिंदू संघटनांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन गोवंश रक्षा समिती आणि हिंदूत्वनिष्ठांनी केले आहे.

अटकेनंतर नालासोपाऱ्यात आतापर्यंत काय काय घडले
वैभव राऊत याला अटक झाल्यानंतर कारवाई खोटी केली त्याला नाहक यात गोवले असल्याचा आरोप करत अनेक हिंदुत्ववादी संघटना, भंडारआळी, बजरंग दल यांनी अंदाजे ५ हजार लोकांची रैली १८ ऑगस्ट २०१८ ला काढली.
त्यात दहशतवाद विरोधी पथकाची सीबीआय कडून चौकशी करावी अशी मागणी करण्यात आली. नंतर ९ सप्टेंबर २०१९ ला पुन्हा सकाळी ११ ते १ वाजेपर्यंत हिंदू धर्मजागृती सभेने हिंदू विरोधात होणाºया कारवाई संदर्भात आणि खोट्या गुन्ह्यात वैभव राऊतला फसवले म्हणून जाहीर जनसंवाद सभेचे आयोजन केले होते.
आता ४ महिन्यानंतर हिंदू धर्मजागृती सभेने ३ फेब्रुवारी २०१९ ला सभेचे आयोजन केले आहे. नालासोपाºयाच्या मुख्य मुख्य नाक्यावर लावण्यात आलेल्या सभेच्या पोस्टरमध्ये वैभव राऊत याचा फोटो वापरलेला आहे.

काय आहे हे प्रकरण
१० ऑगस्ट २०१८ रोजी मुंबई एटीएसने वैभव राऊत याच्या घरावर छापा घालून गावठी पिस्तूले ५, अर्धवट तयार गावठी पिस्तुले ३, ९ एम एम राऊंड ११, ७.६५ एम एम राऊंड ३०, शस्त्रांचे अनेक सुटे भाग उदा. स्प्रिंग, ट्रिगर, २२ गावठी बॉम्ब आणि ५० गावठी बॉम्ब तयार होतील इतकी स्फोटके, बॅटºया, डिटोनेटर्स असे साहित्य जप्त केले असल्याचे सांगून त्याला एटीएसने अटक केली
होती.

पोलीस स्टेशनला साधा अर्ज केला असून अद्याप पर्यंत त्यांना सभेसाठी परवानगी दिलेली नाही. सभेला कोणी येणार असल्याची माहिती मिळाली नसून २०० ते ३०० लोक सभेला येतील असा आमचा अंदाज आहे.
- के. डी. कोल्हे, पोलीस निरीक्षक,
नालासोपारा पोलीस स्टेशन

पोलिसांच्या परवानगीची गरज नसून अर्ज केलेला आहे तसेच महानगरपालिकेच्या मैदानावर होणाºया सभेसाठी ध्वनी आणि जागेची मनपाकडून रीतसर परवानगी घेतलेली आहे. वैभव राऊत हा हिंदू गोवंश रक्षा समितीचा सदस्य असल्यामुळे बॅनरवर त्याचा फोटो प्रसिद्ध करण्यात आला आहे.
- दिप्तेश पाटील, समनवयक, हिंदू गोवंश रक्षा समिती

Web Title: Sunday rally to support Vaibhav Raut; The initiative of pro-Hindu organizations

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.