सासरच्या जाचाला कंटाळून आत्महत्या

By Admin | Updated: September 3, 2016 02:18 IST2016-09-03T02:18:35+5:302016-09-03T02:18:35+5:30

भार्इंदर खाडीवरील रेल्वे पुलावरून वैभवी पाटील (२७) या विवाहितेने शुक्रवारी दुपारी खाडीत उडी घेऊन आत्महत्या केली. अग्निशमन दलाने शोधमोहीम सुरू केली असून

Suicide Suffering | सासरच्या जाचाला कंटाळून आत्महत्या

सासरच्या जाचाला कंटाळून आत्महत्या

मीरा रोड : भार्इंदर खाडीवरील रेल्वे पुलावरून वैभवी पाटील (२७) या विवाहितेने शुक्रवारी दुपारी खाडीत उडी घेऊन आत्महत्या केली. अग्निशमन दलाने शोधमोहीम सुरू केली असून सायंकाळपर्यंत तिचा शोध लागलेला नव्हता. खाडीत उडी मारण्याआधी तिने आपल्या वडिलांना फोन करून दीड वर्षाच्या मुलीचा सांभाळ करा, असे सांगितले. सासरच्या जाचाला कं टाळून वैभवीने हे पाऊल उचलल्याचे तिच्या कुटुंबीयांचे म्हणणे आहे.
वैभवी ही नालासोपारा येथे राहते. तिचे वडील, भाऊ हे वसईला राहतात. भार्इंदर पश्चिम खाडीकिनाऱ्यावर बसवण्यात आलेल्या बाकड्यावर वैभवी येऊन बसली. गणेश विसर्जनासाठी मंडपाचे काम सुरू होते. मात्र, रडणाऱ्या वैभवीची कुणी साधी चौकशीही केली नाही.
तेथील बोटचालकास वसईला जाणार का, असे विचारले. पण,
त्याने जाण्यास नकार दिला. त्यामुळे ती रेल्वे पुलाच्या दिशेने निघून
गेली आणि तिने पुलावरून
खाडीत उडी मारली. हा प्रकार
मंडपाचे काम करणाऱ्या कामगाराने पाहिला. त्याने अन्य जणांना
सांगितले.
उडी मारण्यापूर्वी वडील मोरया पाटील यांना फोन केल्याने तेही भार्इंदर खाडीकिनारी आले. घटनेची माहिती मिळताच पोलिसांसह अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी गेले. जवळपास दोन तास जवानांनी खाडीत तिचा शोध घेतला असे सांगण्यात आले. (प्रतिनिधी)

Web Title: Suicide Suffering