कर्मचाऱ्याला मारहाण
By Admin | Updated: April 24, 2017 02:13 IST2017-04-24T02:13:09+5:302017-04-24T02:13:09+5:30
वाडा तालुक्यातील बिलोशी गावात महावितरणचे काम करीत असणाऱ्या प्रकाश पाटील या कर्मचाऱ्याला गावातील प्रवीण पाटील याने मारहाण केली .

कर्मचाऱ्याला मारहाण
वाडा : वाडा तालुक्यातील बिलोशी गावात महावितरणचे काम करीत असणाऱ्या प्रकाश पाटील या कर्मचाऱ्याला गावातील प्रवीण पाटील याने मारहाण केली . नुकताच विजेची चोरी पकडल्याच्या कारणावरून ही मारहाण झाल्याची शक्यता वर्तविली जात आहे. महावितरणच्या खानिवली शाखा कार्यालयात वरिष्ठ तंत्रज्ञ म्हणून कार्यरत असणारे प्रकाश पाटील बिलोशी गावात कामासाठी गेले असता त्यांना प्रविण पाटील या व्यक्तीने अडविले व शिवीगाळ करीत जबर मारहाण केली. यात प्रकाश पाटील यांना दुखापत झाली असून त्यांनी तक्रार केल्यावर रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला.
तालुक्यातील वीजचोऱ्या रोखण्यासाठी महावितरण कडून सतत प्रयत्न सुरू असून अनेकांवर कारवाई करण्यात आली आहे. बिलोशी गावात नुकतीच वीजचोरी करणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली होती ज्याचा राग मनात धरून ही मारहाण झाल्याचे महावितरणचे म्हणणे आहे. वीजचोरी करणारे जर अशा प्रकारे कर्मचाऱ्यांना मारहाण करीत असतील तर त्यांच्यावर कडक कारवाई व्हायला हवी असे मत महावितरणच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केले.( वार्ताहर )