शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्तृत्वशून्य लोकांकडूनच जाती-धर्माच्या नावे राजकारण केले जाते: नितीन गडकरींचा टोला
2
अजित पवार गटाच्या आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाचा भिवंडीजवळ महामार्गवरील अपघातात मृत्यू
3
कोलकाता नाईट रायडर्स अव्वल स्थानी! LSG ला नमवून प्ले ऑफची जागा जवळपास केली पक्की 
4
रक्तानं आपलं चित्र रेखाटणाऱ्या कलाकाराचं आधी फडणवीसांकडून कौतुक अन् नंतर दिला प्रेमळ सल्ला!
5
निवडणूक रोख्यांमुळे पंतप्रधान कार्यालय वसुलीचे कार्यालय बनल्याचे स्पष्ट- प्रकाश आंबेडकर
6
महायुतीचे उमेदवार उज्ज्वल निकम यांच्यासाठी मुलगा अनिकेत निकम यांचा घरोघरी जाऊन प्रचार
7
लोकसभा निवडणुकीतील तिसऱ्या टप्प्याचे मतदान जवळ येताच सोशल मीडियावर रायगड पोलिसांची करडी नजर
8
डॉक्टर प्रविण अग्रवाल विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल; रुग्ण महिलेसोबत अश्लील वर्तनाचा आरोप
9
अपघात की..? वांद्रे येथे नारळाचे झाड अचानक कोसळले! रिक्षाचालक जखमी, दुकानही जमीनदोस्त
10
मागील दोन महिन्यात झपाट्याने वाढलेल्या सोने-चांदीच्या किंमती घसरल्या, जाणून घ्या भाव
11
ठाण्यात अजब घटना! धक्का लागल्याचा जाब विचारल्याने मद्यपीचा वृद्धावर चाकूने हल्ला
12
धक्कादायक घटना! दहा लाखांमध्ये घराचे आमिष दाखवून एक कोटी ४८ लाखांची फसवणूक
13
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
14
दारूची वाहतूक अन् वाटपावर 'एक्साईज'ची करडी नजर; रात्रंदिवस सोलापुरात पथके राहणार तैनात
15
ठाणे जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी गांभीर्यपूर्वक काम करण्याचे अधिकाऱ्यांना धडे
16
कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार ३८ वर्षीय बाळासाहेब नंदुर्गे यांचा पिंपरीत हृदविकाराने मृत्यू
17
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
18
सोलापुरात भाजपा, काँग्रेस, बसपाच्या  प्रचाराबद्दल आचारसंहिता भंगचे गुन्हे 
19
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
20
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा

उत्तुंग इमारतींमुळे नागरी सुविधांवर पडणार ताण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2018 10:58 PM

भार्इंदर पालिकेत बिल्डर लॉबीच्या फायद्यासाठीच प्रस्ताव सादर

भाईंदर : महासभेत सत्ताधारी भाजपाने शहरात ७० मीटर म्हणजेच सुमारे २४ मजल्यांपेक्षा जास्त उंचीच्या इमारती बांधण्यास मंजुरी दिली. यामुळे बिल्डर लॉबी व बांधकाम क्षेत्रातील राजकारण्यांचा बक्कळ फायद्याचा मार्ग मोकळा झाला आहे. दुसरीकडे काँग्रेस व शिवसेनेने मात्र यास विरोध केला.आधीच सुविधांचा बोजवारा उडाला असून त्यात उत्तुंग इमारतींमुळे नागरी सुविधांवर प्रचंड ताण येईल, अशी भूमिका विरोधी पक्षाने मांडली.महापौर डिम्पल मेहता यांनी मीरा-भार्इंदरमध्ये ७० मीटरपेक्षा जास्त उंचीच्या इमारतींना परवानगी देण्याचा विषय आणला होता. आयुक्त बालाजी खतगावकर यांनी दिलेल्या गोषवाऱ्यात एमएमआरडीएच्या भाडेतत्त्वावरील घरांसाठी चार अतिरिक्त चटईक्षेत्र, परवडणाºया घरयोजनेसाठी तीन चटईक्षेत्र, तर म्हाडा व बीएसयूपी गृहसंकुलांसाठी प्रत्येकी अडीच चटईक्षेत्र अतिरिक्त दिले जात असल्याने उंच इमारती बांधणे अनिवार्य आहे. त्यामुळे खाजगी विकासकांकडून उंच इमारतींच्या परवानगीसाठी मागणी होत असल्याचे आयुक्तांनी म्हटले आहे.सध्या अग्निशमन विभागाकडून ४५ मीटरपर्यंत (१५ मजले) व अतिरिक्त चटर्ईक्षेत्र असलेल्या ७० मीटरपर्यंत (२४ मजले) उंचीच्या इमारतींना नाहरकत दाखले दिले जात आहेत. इमारतीमध्येच पार्किंगसाठी मजले सोडावे लागत असल्याने इमारतीची उंची वाढते. त्यामुळे ४५, ७० मीटर व त्यापेक्षा जास्त उंची वाढवणे आवश्यक ठरते, असा तर्क आयुक्तांनी मांडला. त्या अनुषंगाने ७० मीटरपेक्षा जास्त उंचीच्या इमारतींना मंजुरी देण्यासाठी विकास नियंत्रण नियमावलीत फेरबदल करून कमिटी स्थापन करण्यास मंजुरी देण्याचा प्रस्ताव आणला होता.बिल्डर लॉबीच्या फायद्यासाठी अतिरिक्त चटईक्षेत्र देऊन म्हाडा व एमएमआरडीएने शहराची वाट लावली, असा आरोप काँग्रेसचे अनिल सावंत यांनी केला. न्यू म्हाडा वसाहत आदी भागातील वाहतूककोंडीवरून होणाºया मारहाणीचा दाखला दिला. टीडीआरमुळे आधीच शहरात काँक्रिटचे जंगल उभे राहिले आहे. अग्निशमन दलाकडे आवश्यक मनुष्यबळ, यंत्रणा नाही, असे ते म्हणाले. घनकचºयाचा प्रश्न गंभीर बनलेला आहे. सांडपाणीव्यवस्थेचा थांगपत्ता नाही. पालिकेच्या शाळा आपण धड चालवू शकत नाही, म्हणून खाजगी संस्थांना देण्याचे ठराव करत आहोत. पालिकेच्या दोन्ही रुग्णालयांमध्ये आजही सुविधा देऊ शकलो नाही.पाण्यासाठी दुसºयांवर अवलंबून राहावे लागत असून नागरिकांना पुरेसे पाणीही मिळत नाही. परिवहनसेवा कोलमडलेली आहे. शहराला वाचवायचे असेल तर उंच इमारतींचा प्रस्ताव मागे घ्या, अशी विनंती महापौरांना केली.आयुक्त म्हणतात सर्वकाही चांगले आहेआयुक्त बालाजी खतगावकर यांनी मात्र शहरात रस्ते चांगले आहेत, पाणी पुरेसे आहे, सांडपाणी वाहून नेणारी भूमिगत गटार योजना चांगली आहे, असे दावे केले.तर, भाजपाचे प्रशांत दळवी यांनी ७० मीटरपेक्षा जास्त उंचीच्या इमारतींना मंजुरी देण्याचा ठराव मांडला असता भाजपाच्या सर्व नगरसेवकांनी त्यास पाठिंबा दिला. 

टॅग्स :Mira Bhayander Municipal Corporationमीरा-भाईंदर महापालिका निवडणुकmira roadमीरा रोडbhayandarभाइंदर