चलनबंदीने वसईत झोडण्या थंडावल्या
By Admin | Updated: November 12, 2016 06:20 IST2016-11-12T06:20:04+5:302016-11-12T06:20:04+5:30
८ नोव्हेंबर रोजी जाहीर झालेल्या ५०० व १००० हजार रुपयांच्या चलन बंदीचा परिणाम वसईतील शेतकऱ्यांच्या शेतीकामाला झाला असून अंतिम टप्प्यात आलेल्या भात कापण्या व भात झोडण्या

चलनबंदीने वसईत झोडण्या थंडावल्या
सुनील घरत, पारोळ/वसई
८ नोव्हेंबर रोजी जाहीर झालेल्या ५०० व १००० हजार रुपयांच्या चलन बंदीचा परिणाम वसईतील शेतकऱ्यांच्या शेतीकामाला झाला असून अंतिम टप्प्यात आलेल्या भात कापण्या व भात झोडण्या थंडावल्या आहेत .त्यामुळे दरसाल आस्मानी संकट झेलणाऱ्या शेतकऱ्यांना करावा लागत आहेत सुलतानी संकटाचा सामना. १५० ते २०० हेकटर मध्ये घेतल्या जाणार्या व वसई तालुक्याचे मुख्य पीक असलेल्या भात पिकाच्या सुगीचा जोर धरण्याच्या काळात झालेल्या चलन बंदीचा परिणाम शेतीवर आहे. या भागात शेतमजुरांची मजुरी ही रोजच्या रोज रोखीने होत असते . मात्र त्यांना मजुरी देण्यासाठी शेतकऱ्यांकडे प्रचिलत सुट्टे चलन नसल्याने व शेतकऱ्यांकडे उपलब्ध असलेल्या चलनातून बाद झालेल्या ५०० व १००० च्या नोटा मजूर स्वीकारत नसल्याने शेतकऱ्यांच्या अंतिम टप्प्यातील भात कापण्या व झोडण्या थंडावल्या आहेत . काही तुरळक ठिकाणी कापण्या व झोडण्या सुरु आहेत ती केवळ मजुरांच्या मजुरीची उधारी म्हणून सुरु आहेत. पूर्वीच्या काळी मजूर मजुरी म्हणून शेतात पिकलेले धान्य स्वीकारत होते . मात्र आता रोखीने मजुरीचे व्यवहार होत आहेत. तसेच पुढे सुरु होणाऱ्या रब्बी हंगामाला लागणारे बियाणे,खते,औजारे,औषधे आदी लागणारे साहित्य खरेदी व शेती नांगरणीसाठी लागणारा खर्च भागवण्यासाठी शेतकऱ्यांच्या हातात पैसे नाहीत. शेतकऱ्यांच्या सोयीसाठी वसई तालुक्यातील सहकारी व राष्ट्रीय बँकांनी शेतकऱ्यांचे आर्थिक व्यवहार सुरळीत करण्यासाठी वेगळी व्यवस्था करण्याची मागणी कृषी उत्पन्न बाजार समिती वसईचे उपाध्यक्ष प्रकाश पाटील यांनी केली आहे.