सूर्याचे काम बंद पाडण्यासाठी शेतकऱ्यांनी पोकलेनखाली मारल्या उड्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2019 11:38 PM2019-01-13T23:38:19+5:302019-01-13T23:38:26+5:30

प्रसंगावधान राखून पोलिसांनी त्याच्या पाठोपाठ खड्यात उड्या मारून त्या शेतकºयास फरफटत बाहेर काढून त्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला.

To stop the work of the Surya, farmers jump bofore poklane | सूर्याचे काम बंद पाडण्यासाठी शेतकऱ्यांनी पोकलेनखाली मारल्या उड्या

सूर्याचे काम बंद पाडण्यासाठी शेतकऱ्यांनी पोकलेनखाली मारल्या उड्या

Next

मनोर : मुंबई अहमदाबाद महामार्गा लगत दुर्वेस येथे सुर्यप्रकल्प पाणी पुरवठ्याचे काम सुरू असून जमिनीचा निवाडा करता पोलीस सर्वेक्षणात काम सुरू असल्याने संतप्त शेतकºयांनी २० फूट खड्ड्यात उडी मारून पोखलेन मशीन खाली जीव देण्याचा प्रयत्न केला. यामुळे हे प्रकरण पेटणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.


प्रसंगावधान राखून पोलिसांनी त्याच्या पाठोपाठ खड्यात उड्या मारून त्या शेतकºयास फरफटत बाहेर काढून त्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला. मीरा भार्इंदर, वसई विरार महापालिकेच्या तसेच २७ गावांसाठी एमएमआरडीए मार्फत ४०३ एम एल डी पाणी पुरवठा योजना राबविली जात असून त्या साठी राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पाने रस्त्यासाठी शेतकºयांच्या जमिनी त्यांच्या मर्जी विरोधात संपादित केल्या होत्या.


हा महामार्ग सहा पदरी होणार असून त्याचे अनेक ठिकाणी काम ही अपूर्ण आहे. हलोली, वाडाखडकोना, नांदगाव येथे एमएमआरडीएने काम सुरू केले होते मात्र शेतकºयांच्या विरोधानंतर ते काम बंद पडले आहे. मात्र, दुर्वेस येथे पोलीस संरक्षणात पुन्हा हे काम सुरू केले आहे. या प्रकाराला तेथील शेतकरी अविनाश पाटील यांनी विरोध केला होता. त्याची दखल घेऊन मनोरचे प्रभारी जायभाये यांनी त्या दिवसासाठी काम बंद करण्यास सांगितले होते.


शुक्र वारी अविनाश पाटील, संतोष दयानंद सराफ, सुदाम डोंगले व इतर शेतकरी जिल्हाधिकारी डॉ. नारनवरे यांची भेट घेऊन सुद्धा या जमिनीच्या प्रकरणात न्याय निवाडा झालेला नाही. त्यामुळे यंत्रणांनी सुरु केलेले काम बेकायदेशीर असल्याचे शेतकºयांचे मत आहे. जिल्हाधिकाºयांनी पालघर उपविभागीय अधिकाºयांसोबत बैठक घेण्याचे निर्देश दिले होते.


जर शेतकºयांचे प्रश्न सुटले नाही तर २२ जानवरीला जिल्हाधिकारी कार्यालयात समबंधीत अधिकाºयासोबत बसून तोडगा काढण्यात येईल असे ठरले होते. त्या नंतर शेतकºयांना उप विभागिय अधिकाºयांनी १७ जानेवारीला शेतकरी व संबधित अधिकाºयांची बैठक बोलावली आहे असे अविनाश पाटील सांगितले होते. मात्र त्यानंतर शनिवारी पुन्हा एमएमआरडीएने पोलीस बंदोबस्तात कामाला सुरवात केल्याने अविनाश पाटील, संतोष शरफ, सुदाम डोंगले, बल्या कटेला, बरकू आडगा यांनी आडकाढी केली. मात्र, यंत्रणा जुमानत नसल्याने २० फूट खड्ड्यात उडी मारुन पोखलेन मशीन खाली आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. मनोर पोलीस ठाण्यात त्या पाच जनावर सरकारी कामात अडथळा कलम ३५३ गुन्हे दाखल केले असून अधिक तपास प्रभारी श्रीधवा जायभाये मनोर पोलीस ठाणे करीत आहे.

Web Title: To stop the work of the Surya, farmers jump bofore poklane

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.