शहरं
Join us  
Trending Stories
1
“भाजपाला पराभव दिसू लागलाय, प्रचंड मताधिक्यांनी १०० टक्के विजयी होणार”: विशाल पाटील
2
“कातळ शिल्पाचे समर्थन करणारे राज ठाकरे खरे की रिफानरीचे समर्थन करणारे”; ठाकरे गटाचा सवाल
3
‘मुलीला वडिलांच्या संपत्तीत ५० टक्के अधिकार, हा सरकारचा कायदा’, सुप्रिया सुळेंचा जानकरांना टोला 
4
मोदींना पाठिंबा देताच राज ठाकरेंची साथ सोडणारे कीर्तिकुमार शिंदे ठाकरे गटात, उद्धव ठाकरेंनी बांधलं शिवबंधन
5
IPL 2024 CSK vs PBKS : पंजाबने टॉस जिंकला! ऋतुराजची मिश्किल टिप्पणी; अखेर सँटनरची एन्ट्री
6
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
7
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
8
'राणेंचा प्रचार करायला लागतोय यातच राज ठाकरेंचा विजय'; काँग्रेस नेत्याची बोचरी टीका
9
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
10
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
11
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
12
धक्कादायक! कोविड सारख्या 'या' गंभीर आजारामुळे हजारो 'श्वान' मरणाच्या दारात!
13
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
14
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
15
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
16
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
17
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
18
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
19
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
20
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या

‘गाड्यांना डहाणू रेल्वे स्थानकात थांबा द्या’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 05, 2020 12:18 AM

डहाणू : पश्चिम रेल्वेच्या वांद्रे टर्मिनसवरून कोरोना शिथिल काळात सुरू केलेल्या वांद्रे टर्मिनस ते अजमेर आणि वांद्रे टर्मिनस ते ...

डहाणू : पश्चिम रेल्वेच्या वांद्रे टर्मिनसवरून कोरोना शिथिल काळात सुरू केलेल्या वांद्रे टर्मिनस ते अजमेर आणि वांद्रे टर्मिनस ते उदयपूर या लांब पल्ल्याच्या रेल्वे गाड्यांना डहाणू रोड रेल्वे स्थानकात थांबा देण्यात यावा, अशी मागणी पालघर लोकसभा मतदारसंघाचे खासदार राजेंद्र गावित यांच्याकडे रेल्वे प्रवाशांनी केली आहे.१ आॅक्टोबरपासून नव्याने सुरू केलेली वांद्रे टर्मिनस ते अजमेर ही गाडी बुधवार, शुक्रवार आणि शनिवारी संध्याकाळी ४ वाजून १५ मिनिटांनी सुटते, तर वांद्रे टर्मिनस ते उदयपूर रेल्वेगाडी मंगळवार, गुरुवार आणि शनिवारी रात्री ११ वाजून २५ मिनिटांनी सुटते. या एक्सप्रेस गाड्यांना बोरीवली, वापी, बलसाड, सुरत असे थांबे दिलेले आहेत. त्यामुळे पालघर, डहाणू, बोईसर, वाणगाव येथील रेल्वे प्रवाशांसाठी रेल्वेने कोणतीही सोय केलेली नाही. त्यातच डहाणूपर्यंतची उपनगरीय सेवाही सर्वसामान्यांसाठी बंद आहे. यामुळे पालघर जिल्ह्यातील लोकांना अजमेर, उदयपूर किंवा हरिद्वारसारख्या तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी जाण्यासाठी तसेच कोरोना संसर्ग काळात अडकून पडलेल्या प्रवाशांना या रेल्वे गाड्या मिळण्यासाठी खाजगी वाहनाने बोरिवली किंवा वापी येथे जाणे आर्थिकदृष्ट्या शक्य होत नाही. यासाठी जिल्ह्यातील जनतेच्या सोयीसाठी या गाड्यांना डहाणू रोड रेल्वे स्थानकात थांबा देण्यात यावा, अशी मागणी प्रवाशांनी खा. राजेंद्र गावित यांच्याकडे केली आहे.

टॅग्स :western railwayपश्चिम रेल्वे