चारोटी उड्डाणपुलाच्या कामाला सुरुवात
By Admin | Updated: January 4, 2016 01:28 IST2016-01-04T01:28:24+5:302016-01-04T01:28:24+5:30
राष्ट्रीय प्राधीकरणाने परवानगी दिल्याने चारोटी नाक्यावरील उड्डाणपूलाच्या बांधकामास रविवारी प्रारंभ झाला. यामुळे स्थानिकांचा अत्यंत जिव्हाळ््याचा प्रश्न मार्गी लागला आहे

चारोटी उड्डाणपुलाच्या कामाला सुरुवात
शौकत शेख, डहाणू
राष्ट्रीय प्राधीकरणाने परवानगी दिल्याने चारोटी नाक्यावरील उड्डाणपूलाच्या बांधकामास रविवारी प्रारंभ झाला. यामुळे स्थानिकांचा अत्यंत जिव्हाळ््याचा प्रश्न मार्गी लागला आहे. वर्षानुवर्षी रखडलेल्या या पूलाच्या बोगदयाची उंची ४ मीटर आणि रुंदी १०.५० मीटर करण्यावर शिक्कामोर्तब झाल्याचे नॅशनल हायवेचे कार्यकारी अभियंता आर्थडिकर यांनी सांगीतले आहे. आमदार आनंद ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि भारत सरकारचे रस्ते वाहतूक आणि हायवे बोर्डाचे सदस्य भरत राजपूत यांच्या अध्यक्षतेखाली ,आणि एन.एच. आय.आणि आयआरबींचे अधिकारी ,स्थानिक हॉटेल व्यवसायिक, दुकानदार ,प्रतिष्ठीत नागरीक , यांची उपस्थिती या वेळी होती. डहाणूच्या शासकीय विश्रामगृहात पार पडलेल्या बैठकीत रखडलेले काम मार्गी लावण्यात आले होते. त्यानंतर आय आरबी कंपनीने काम सुरूही केले होते परंतु, या उड्डाणपूलला हायवे आॅथरीटीची परवानगी मिळाली नसल्याने काम बंद ठेवावे लागले होते. मात्र काही दिवसापूर्वी ही मंजूरी मिळाल्याने कामाला सुरूवात झाली आहे. डहाणू जव्हार राज्यमार्गावरील चारोटी नाका उडडाणपूलाअभावी मृत्यूचा सापळा बनलेला असून हायवे ओलांडताना अपघातात शेकडो स्थानिक पादचारी आणि दुचाकी चालकांचे नाहक बळी गेले आहेत. २००८ साली मंजूर झालेला हा उड्डाणपूल प्रशासन, ठेकेदार कंपनी आणि स्थानिकांतील समन्वयाचा अभावा यामुळे हे काम जवळपास सात वर्षे रेंगाळलेल्या अवस्थेत होते. त्याची किंमत अपघातातील बळींना चुकवावी लागली.