आगाशी बाजारात सागरी सुकामेवा तेजीत
By Admin | Updated: May 23, 2017 01:26 IST2017-05-23T01:26:33+5:302017-05-23T01:26:33+5:30
समुद्रातील सुका मेवा अर्थात सुकविलेल्या मच्छीे विक्रीच्या गेल्या पन्नास वर्षांहून अधिक काळापासून आगाशी येथील टेंभीपाडा येथे

आगाशी बाजारात सागरी सुकामेवा तेजीत
शशी करपे
लोकमत न्यूज नेटवर्क
वसई : समुद्रातील सुका मेवा अर्थात सुकविलेल्या मच्छीे विक्रीच्या गेल्या पन्नास वर्षांहून अधिक काळापासून आगाशी येथील टेंभीपाडा येथे भरत असलेल्या दर सोमवारच्या आठवडा बाजारात खरेदीसाठी प्रचंड झुंबड उडू लागली आहे. सोमवारी तर खरेदीदारांच्या गर्दीने विक्रमच केला.
आगारी, कोळी, आदिवासी, वाडवळ, कातकरी यांच्यासह ठाणे आणि पालघर जिल्ह्यातील स्थानिक समाजात पावसाळंयात सुकी मासळी साठवण करण्याची परंपरा आहे. त्यासाठी दोन्ही जिल्ह्यात अनेक ़भागात सुकी मासळीच्या बाजारपेठा आहेत. पण, विरारजवळील आगाशीतील टेंभीपाडा गावात दर सोमवारी भरणाऱ्या सुकी मासळीच्या बाजाराला वेगळेच महत्व आहे. गेल्या पन्नास वर्षांहून अधिक काळापासून हा बाजार नियमिते भरत असतो. पावसाळ््याचे चार महिने वगळता या बाजारात सुकी मासळीची मोठ्या प्रमाणावर विक्री होते. बाजाराचे आणखी एक वैशिष्ट़य म्हणजे बाजारात फक्त आणि फक्त महिलाच सुकी मासळी विकण्याचा व्यवसाय करतात.
सुकी मांदेली, बोंबील, करदी, सोडे, जवला आणि खारे याचा समावेश आहे. उत्तनसह वसई, पालघर आणि डहाणू तालुक्यातील समुद्रकिनारी सुकी मासळीेच मोठ्या प्रमाणावर उत्पादन होते. पावसाळ््यात मासेमारीला बंदी असल्याने मासळी मिळत नसल्याने स्थानिक भूमिपूत्रांसह शहरातील लोक मोठ्या प्रमाणावर सुकी मासळी साठवून ठेवतात. दर सोमवारी पहाटे सहा वाजल्यापासून दुपारपर्यंत बाजार भरतो. त्यासाठी वसई तालुक्यातील मासे विक्रेत्या महिलांसह पालघर आणि डहाणू तालुक्यातील तसेच उत्तन परिसरातील महिलाही याठिकाणी भल्या पहाटे येत असतात. खरेदीदारांमध्ये फक्त वसई तालुक्यातील खवैय्यच येतात असे नाही तर ठाणे, भिवंडी, कल्याण, पालघर, डहाणू इतकेच नव्हे तर गुजरातमधील वापीपासूनच्या ग्राहकांचा समावेश आहे. दर सोमवारी किमान वीस लाखांहून अधिकची उलाढाल होत असल्याची माहिती टेंभीपाड्याचे पोलीस पाटील शैलेश वैती यांनी दिली. या बाजाराने टेंभीपाड्यासह वसई तालुक्यातील हजारो मासेमारी कुटुंबांना मोठ्या रोजगार मिळवून दिला आहे, असेही वैती यांनी सांगितले.
पावसाळ््याला आता काहीच दिवस शिल्लक असल्याने गेल्या दोन सोमवारपासून बाजारात खरेदीदारांची झुंबड उडाली आहे. आजच्या बाजारात अल्लोट गर्दी पहावयास मिळाली. यंदाचे वैशिष्टय म्हणजे सुकी मासळीच्या दरात कोणतीच वाढ झालेली नाही. पहाटेपासून दुपारपर्यंत रस्त्यावर उभे राहून किमान हजारभर महिला व्यवसाय करतात. तर खरेदीदारांची संख्या दुप्पट असते. बाजार कर वसूल केला जात असतांना याठिकाणी साधी प्रसाधन गृह नाही. त्यामुळे महिलांना मोठा त्रास सहन करावा लागतो.