शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
2
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
3
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
4
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
5
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
6
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
7
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
8
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
9
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
10
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
11
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
12
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
13
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
14
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
15
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
16
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
17
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
18
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
19
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
20
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
Daily Top 2Weekly Top 5

सासुरवाडीला आलेल्या जावयावर चाकूने वार, बुलढाण्यातील तरुणाचा पालघरमध्ये खून

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2025 07:52 IST

या प्रकरणी पालघर पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली आहे.

पालघर : येथे सासुरवाडीला आलेल्या महादेव दौलत घुगे (३०, रा. बुलढाणा) या विवाहित तरुणावर बोईसर येथील दोन तरुणांनी हुतात्मा चौक परिसरात चाकूचे वार करून हत्या केल्याची घटना बुधवारी रात्री घडली. सिल्वासा येथील रुग्णालयात उपचार सुरू असताना त्याचा गुरुवारी (दि. २) मृत्यू झाला. या प्रकरणी पालघरपोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली आहे.

बुलढाणा जिल्ह्यातील महादेव घुगे याचा दोन महिन्यांपूर्वी पालघरमधील खानपाडा परिसरातील एका तरुणीशी विवाह झाला होता. विवाहानंतर पत्नीची तब्येत बरी नसल्याने ती माहेरी पालघर येथे आली होती. तिला नेण्यासाठी महादेव पालघरला आला होता. बुधवारी रात्री तो एका गुत्त्यावर दारू पिण्यासाठी बसल्यानंतर त्याची बोईसर येथे राहणाऱ्या साहिल राजू वाघारी (२३) याच्याशी ओळख झाली. त्यानंतर हे दोघेही फिरत हुतात्मा स्तंभ परिसरात आले. आरोपी साहिलला त्याचा मित्र अनिस इद्रिस खान (२५) भेटला. तेव्हा तिघांमध्ये वादावादी झाली. त्यानंतर दोन्ही आरोपींनी महादेववर चाकूने वार करून पळून गेले. जखमी अवस्थेत महादेव यांनी पालघर पोलिस ठाणे गाठून पोलिसांना घडलेली हकिकत सांगितली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत जवळच असलेल्या साहिल वाघारी याला ताब्यात घेतले; मात्र दुसरा आरोपी अनिस खान हा पळून गेला होता. त्याला बोईसरच्या गदापाडा परिसरातून अटक करण्यात आली. 

उपचारादरम्यान मृत्यू-  गंभीर जखमी असलेल्या महादेव घुगे याला प्रथम उपचारासाठी पालघरच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर त्याला अत्यवस्थ अवस्थेत पुढील उपचारासाठी सिल्वासा येथील रुग्णालयात नेण्यात आले; मात्र, गुरुवारी त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. -  या प्रकरणी पोलिसांनी दोन्ही आरोपींविरोधात प्रथम जिवे मारण्याचा प्रयत्न या गुन्ह्याची नोंद केल्याचे पालघर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अनंत पराड यांनी सांगितले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसpalgharपालघर