शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

तारापूर एमआयडीसीतील घनकचरा रस्त्यावर

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 21, 2018 23:54 IST

पावसामुळे प्रदुषणाचा धोका; महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाच्या अटी शर्तींना फाटा

- पंकज राऊत बोईसर : तारापूर एमआयडीसीतील रासायनिक कारखान्यातून निघालेला सुमारे १४ टन घातक घनकचऱ्याच्या सुमारे दोनशे गोणी बोईसर - चिल्हार फाटा या मुख्य रस्त्याच्या कडेला तसेच महामार्गावर उघड्यावर टाकण्यात आल्या आहेत.रासायनिक कारखान्यातून निघणाºया घनकचºयाच्या विल्हेवाटी करीता मुंबई वेस्ट मॅनेजमेंटच्या सामुदायिक घनकचरा विल्हेवाट प्रक्रि या केंद्राकडे पाठविण्याच्या प्रदुषण नियंत्रणच्या सूचना असताना अनेक कारखाने त्याकडे दुर्लक्ष करुन रात्री अंधाराचा फायदा घेऊन उघड्यावर टाकण्याच्या घटना वाढल्या आहेत. विषेश म्हणजे हा कचरा प्रक्रीयेद्वारे विल्हेवाट लावण्याच्या अटी व शर्ती महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ (एमपीसीबी) कडून कारखान्यांना दिलेल्या संमतीपत्रात (कन्सेंट) मध्ये आहेत. अहोरात्र चालणाºया बोईसर ते मुंबई-अहमदाबाद महामार्गाला जोडणाºया चिल्हार फाटा या मुख्य रस्त्यावरील वाघोबा खिंड, चिर व महामार्गावरील मेंडवड खिंडीत उघड्या वर टाकल्याने धोका वाढला आहे. पावसामुळे तो विरघळून रसायन मिश्रीत पाणी शेतात पसरण्याची शक्यता असून ते पाणी गुरांनी प्यायल्यास त्यांनाही धोका उद्भवू शकतो असे तज्ज्ञांचे मत आहे. विशेष म्हणजे जेव्हा घनकचरा विल्हेवाटी करीता मुंबई वेस्ट मॅनेजमेंटकडे पाठविण्यात येतो तेव्हा इन्व्हाईसच्या पाच प्रती काढून पहिली कॉपी तसेच वेगवेगळ्या उत्पादन प्रक्रि येनंतर निघालेला घनकचरा व विल्हेवाटीसाठी पाठविलेला कचरा याचा संपुर्ण तपशील एमपीसीबी (तारापूर -एक) उपप्रादेशिक कार्यालयात पाठविणे बंधनकारक असते. मात्र, अश्या पद्धतीने तो उघड्यावर टाकून कराराचा भंग होत आहे.नमूने पृथक्करणानंतर लागणार ‘त्या’ कारखान्यांचा शोधएमपीसीबीच्या तारापूर दोन या कार्यालयातून हा घनकचरा मुंबई वेस्ट मॅनेजमेंटकडे विल्हेवाटीसाठी पाठविण्याची प्रक्रि या सुरू क रण्यात आली असून कचºयाचे नमुने पृथक्करणासाठी एमपीसीबीच्या व मुंबई वेस्ट मॅनेजमेंटच्या प्रयोग शाळेत पाठविण्यात आले आहेत. त्याचा अहवाल प्राप्त होताच तो कचरा कुठल्या उद्योगाचा हे कळणार आहे.अवैधरीत्या टाकलेला घन कचरा उचलण्यात येत असून लवकरच आम्ही तो कचरा कुठल्या कारखान्याचा होता त्याचा शोध घेऊन कठोर करवाई करू- डॉ. अर्जुन जाधव,उप प्रादेशिक अधिकारी (एमपीसीबी, तारापूर-२)

टॅग्स :thaneठाणेVasai Virarवसई विरार