बाजारात छोट्या ग्राहकांची धूम

By Admin | Updated: June 15, 2016 00:49 IST2016-06-15T00:49:19+5:302016-06-15T00:49:19+5:30

जव्हार तालुक्यातील शाळेच्या सुट््ट्या आता संपल्या परंतु असह्य उन्हाचे चटके मात्र आजही लागत आहेत. पावसाने अद्याप सुरवात केलेली नसल्यामुळे कडक उन्हातही खेडोपाड्यातील व शहरातील

Smokin small customers in the market | बाजारात छोट्या ग्राहकांची धूम

बाजारात छोट्या ग्राहकांची धूम

जव्हार : जव्हार तालुक्यातील शाळेच्या सुट््ट्या आता संपल्या परंतु असह्य उन्हाचे चटके मात्र आजही लागत आहेत. पावसाने अद्याप सुरवात केलेली नसल्यामुळे कडक उन्हातही खेडोपाड्यातील व शहरातील बांधव शालेय खरेदीच्या धावपळीत आहेत. विद्यार्थी आणि पालक या सर्वांना शाळेचे वेध लागले आहे. सध्या विद्यार्थी जगतात दप्तर, वह्या-पुस्तके, रजिस्टर, नवीन शाळेचे गणवेश, शालेय साहित्य, बूट, रेनकोट, छत्र्या या सारख्या वस्तूंची खरेदी करण्यासाठी बाजारपेठेत मोठी गर्दी झालेली आहे. जव्हार तालुक्यात एकुण १ लाख ६० हजारच्या आसपास लोकसंख्या आहे, आणि खेडोपाड्यातील विद्यार्थ्यांना व शहरी विद्यार्थ्यांना या सर्व शालेयपयोगी वस्तू खरेदीसाठी जव्हार येथील बाजारपेठेत यावे लागत, त्यामुळे मोठ्या संख्येने बाजरपेठ भरगच्च असल्याचे दृष्य सर्वत्र दिसत आहे.
शालेय साहित्याची खरेदी करण्याकरीता विद्यार्थी येत आहेत. गतवर्षापेक्षा यंदा हे साहित्य १५ ते २० टक्क्यांनी वाढल्यामुळे खिशाला कात्री लागल्याने पालकवर्गात थोड्या प्रमाणात नाराजी आहे. विद्यार्थ्यांना लागणारे दप्तर, कंपास बॉक्स, छत्री, रेनकोट याचे अनेक प्रकार उपलब्ध असतात, त्यामुळे विद्यार्थी कुठल्या वस्तूंची निवड करेल, याची कल्पना दुकानदाराला नसते त्यामुळे तो जास्तीतजास्त व्हरायटीचा स्टॉक करून ठेवतो. परंतु यंदा दुष्काळ, पाणीटंचाई याचे सावट असल्याने व अद्यापही पाऊस सुरु न झाल्याने त्याचे सावट खरेदीवर आहे. त्यामुळे व्यापारी वर्गाचीही मोठ्याप्रमाणात रक्कम अडकून पडलेली आहे. जेव्हा सिझन सुरू झाला की, व्यापाऱ्याला जेवणाचीही फुरसत नसते, असे जव्हारच्या व्यापाऱ्यांनी सांगितले. (वार्ताहर)

यंदा बाजारपेठेत चांगली गर्दी दिसत आहे, रजिस्टर, पेन, कंपास, दप्तर, छत्री, रेनकोट खरेदी करीता ग्राहक येत आहेत. बाजारपेठत गर्दी चांगली आहे. पाऊस मात्र नसल्यामुळे छत्री विक्रीवर थोडा परिणाम होत आहे.
- अवेश मिन्नी, नुरानी व्यापारी, जव्हार

Web Title: Smokin small customers in the market

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.