बोईसर शहरातील रस्त्यांवर धूरच धूर
By Admin | Updated: February 11, 2017 03:42 IST2017-02-11T03:42:46+5:302017-02-11T03:42:46+5:30
येथील मुख्य रस्त्यावर आणि नागरी वसाहती मध्ये प्लास्टीक सह काही कचरा सर्रास पणे जाळ न्यांत येत असल्याने घातक धुरांचे साम्राज्य हवेत पसरून त्याचा विपरीत परिणाम आरोग्यावर

बोईसर शहरातील रस्त्यांवर धूरच धूर
पंकज राऊत, बोईसर
येथील मुख्य रस्त्यावर आणि नागरी वसाहती मध्ये प्लास्टीक सह काही कचरा सर्रास पणे जाळ न्यांत येत असल्याने घातक धुरांचे साम्राज्य हवेत पसरून त्याचा विपरीत परिणाम आरोग्यावर होऊन त्या धुरा मुळे नागरिकासह वाहन चालक त्रस्त होत असून रस्त्यावरील धुरांच्या लोटामुळे अपघाताचीही शक्यता आहे
सफाई कर्मचारी, ३ ट्रक्टर, ५ घंटागाडी आणि एक छोटा ट्रक एवढी मोठी यंत्रणा बोईसर ग्रामपंचायत हद्दितील कचरा उचलण्या करीता उपलब्ध असतानाही प्लास्टिक सह काही सुका कचरा जाळून पर्यावरणाच्या कायद्याची पायमल्ली केली जात असूनही याकडे ग्रामपंचायतींसह सर्व यंत्रणा व लोकप्रतिनिधी दुर्लक्ष करीत आहेत.
सार्वजानिक ठिकाणी कचरा जाळणे हा गंभीर गुन्हा असून काही कचऱ्याची विल्हेवाट अशा पध्दतीने लावण्यात येत असल्याने वातावरणातील उष्णता वाढते तर रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पसरणाऱ्या धुरामुळे समोरचे काही दिसत नसल्याने अपघात होण्याची दाट शक्यता आहे.
जाळण्यात येणाऱ्या कचऱ्यामध्ये जास्त प्लास्टीक असल्याने त्या धुरामधून कार्बनडाय आॅक्साईड व फ्रीयॉन असे विषारी वायू उत्सर्जित होऊन त्या पासून सभोवतालच्या नागरिकांना कॅन्सर सारख्या गंभीर आजाराचा प्रदुर्भाव होण्याची शक्यता असते तर निकृष्ठ दर्जाच्या प्लास्टिक पिशव्यांच्या रंगा पासूनही आरोग्यास धोका निर्माण होतो. या विषारी धुराचा त्रास रस्त्यावरुन ये जा करणारे विद्यार्थी, वयोवृद्ध, गरोदार महिला यांच्या सह सर्व नागरिकांना होत आहे धुरामुळे अनेक आजारासह दमा व श्वसनाचे विकार उद्भवू शकतात तर काही रुग्णालया पर्यंत धुर जाऊन तेथे उपचार घेणाऱ्या रुग्णाबरोबरच नागरी वसाहतीतील राहिवाशांनाही त्याचा त्रास सहन करावा लागत आहे.