बुडालेली मुले बेपत्ताच

By Admin | Updated: July 6, 2016 02:25 IST2016-07-06T02:25:01+5:302016-07-06T02:25:01+5:30

वाढदिवस साजरा करणसाठी अर्नाळ्याच समुद्रात उतरलेल्या दोन मुलांचे मृतदेह अद्यापही पोलीसांच्या हाती लागलेले नाहीत.

Sleepy children disappear | बुडालेली मुले बेपत्ताच

बुडालेली मुले बेपत्ताच

वसई : वाढदिवस साजरा करणसाठी अर्नाळ्याच समुद्रात उतरलेल्या दोन मुलांचे मृतदेह अद्यापही पोलीसांच्या हाती लागलेले नाहीत.
विरारच्या गोपचर पाड्यातील आशीष मोहिते (२१), त्याचा लहान भाऊ आदर्श मोहिते (१६), मैत्रिण पूजा (१९), प्रिया (२१) आणि मित्र अक्षय मोरे (२०) यांच्यासह वाढदिवस साजरा करण्यासाठी रविवारी सांकाळी अर्नाळा समुद्र किनारी गेले होते. ६ वाजण्याच्या सुमारास ते पाण्यात उतरले असता, मोठ्या लाटांमुळे ते आत ओढले गेले. त्यांना बुडताना पाहून स्थानिक मच्छिमारांनी पाण्यात उड्या टाकून प्रिया, पूजा आणि आदर्शला वाचवले. मात्र, आशिष आणि अक्षयला वाचवण्यात त्यांना यश आले नाही.
सागरी किनारा पोलीस ठाण्याचे पोलीस घटनास्थळी पोहोचले. रात्री उशिरार्पंत पोलीस, तट रक्षक, पोलीस मित्र आणि मच्छिमार बांधव समुद्रात त्यांचा शोध घेत होते. दुसऱ्या आणि तिसऱ्या दिवशीही त्यांचा राजोडी, कळंब, नवापुर समुद्रात तपास सुरु होता. गेल्या महिन्यातही गोरेगांव येथील तरूण आपल्या मैत्रिणीला घेवून वसईला वाढदिवस साजरा करण्यासाठी आला होता. दुचाकीवरून परततांना अपघात होवून दोघेही ट्रकखाली चिरडले गेले होते. (प्रतिनिधी)

Web Title: Sleepy children disappear