जव्हार : या पंचायत समिती कार्यालयातील तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयाचा स्लॅब सोमवारी सायंकाळी कोसळला. या अपघातात कार्यालयातील कोणत्याही कर्मचाऱ्याला दुखापत झाली नाही. या अपघातात आरोग्य विभाग कार्यालयातील खुर्ची तुटली, टेबलावरील काच, ट्यूब लाईट फुटली. ज्या टेबलावर तो कोसळला ते ज्यांचे होते ते पर्यवेक्षक के.के.कांबळे हे नेमके त्यावेळी जागी नसल्याने दुर्घटना टळली.जव्हार पंचायत समितीच्या आरोग्य विभागाची ही इमारत सन-२०१२ मध्ये बांधली गेली. अवघ्या पाच वर्षात तिचा स्लॅब कोसळला. यावरुन तिच्या बांधकामाच्या दर्जाची कल्पना येते. यामुळे या कार्यालयात काम करणारे कर्मचारी भयग्रस्त झाले असून या बांधकामाच्या चौकशीची मागणी होत आहे. (वार्ताहर)
कार्यालयाचा स्लॅब कोसळला
By admin | Updated: December 22, 2016 05:28 IST