तीन आरोपींना सहा वर्षांची सक्तमजुरी

By Admin | Updated: February 19, 2016 02:18 IST2016-02-19T02:18:34+5:302016-02-19T02:18:34+5:30

बोईसर एमआयडीसी मधील विनायक कंपनी समोरील विद्युत महावितरण कंपनीच्या इलेक्ट्रिक ट्रान्सफार्मरमधून आॅइल चोरी करणाऱ्या चोरट्यांना अडविण्या

Six accused of six years for three accused | तीन आरोपींना सहा वर्षांची सक्तमजुरी

तीन आरोपींना सहा वर्षांची सक्तमजुरी

पालघर : बोईसर एमआयडीसी मधील विनायक कंपनी समोरील विद्युत महावितरण कंपनीच्या इलेक्ट्रिक ट्रान्सफार्मरमधून आॅइल चोरी करणाऱ्या चोरट्यांना अडविण्याचा प्रयत्न करणाऱ्या बोईसर पोलिस स्टेशनच्या हेडकाँस्टेबलला मारहाण करुन त्याचे अपहरण केल्या प्रकरणी पालघरचे सत्र न्यायाधीश एम. एस क्षीरसागर यांनी ३ आरोपींना ६ वर्षाची सक्तमजूरी आणि ११ हजाराचा दंड अशी शिक्षा सुनावली.
बोईसर एमआयडीसी औद्योगिक परिसरात महावितरण कंपनीच्या ट्रान्सफॉर्मरमधून आॅइल चोरीच्या घटना मध्ये वाढ होत असल्याच्या तक्रारीमुळे बोईसर पोलिस स्टेशनचे हेड कॉन्स्टेबल जयवंत बिडवई, के जी बोंड आणि विद्युत विभागाचे काटरेला लिंगारेड्डी इ. २८ नोव्हेंबर २०११ रोजी पहाटे २ वाजता एमआयडीसी परिसरात गस्त घालीत असताना २ ट्रक संशयास्पद अवस्थेत उभे असल्याचे आढळून आले. पोलिसांनी चौकशी केली असता ट्रक नादुरुस्त असल्याचे सांगितले. त्या नंतर पहाटे २.४५ वाजता जे जी प्लॉट सत्तर बंगला परिसरतून येत असताना पून: तेच ट्रक उभे असल्याचे पोलिस बिडवई याना आढळून आले. त्यानी आपल्या मोटर सायकलवरुन खाली उतरून पाहिले असता ट्रान्सफॉर्मर मधून पाइप पाईपद्वारे आॅइल चोरी सुरु असल्याचे पाहिले. त्यांनी चोरटयांना हटकले असता. त्यांनी आपल्या गाडीतील लोखंडी टॉमी ने त्यांना मारहाण करायला सुरुवात केली. त्यामुळे सोबत असलेले लाईनमन रेड्डी मदतीसाठी आले असता चोरट्यांनी बिडवाई यांना दोरखंडाने बांधले आणि उचलून ट्रक मध्ये टाकून पळ काढला बिडवई यांनी मोठ्या प्रयत्नाने आपली सुटका करुन घेतली आणि मोबाइल वरुन वरिष्ठांशी संपर्क साधला. हा ट्रक वाड्यातील खण्डेश्वरी नाका येथे पोलिसांनी आडवला. त्यामुळे बिडवई यांची सुटका झाल्या नंतर ह्या प्रकरणी पोलिसांनी १) रघुवीर बजिरचंद राजपूत (२८वर्ष), २)सोमपाल मोतीलाल घोषि (२०वर्ष) ३)वीरेंद्र मुन्शीराम खेपरा (२४) सर्व राहणार नागपूर यांना पकडले. त्यांच्या अटकेनंतर या तेलाच्या चोऱ्यांना आळा बसला होता.

Web Title: Six accused of six years for three accused

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.